Share

INS Vikrant | भारताची सर्वात मोठी युद्धनौका आएनएस विक्रांत आजपासून नौदलाच्या सेवेत

Published On: 

नवी दिल्ली : 1999 साली आयएनएस विक्रांत बनवण्यात येणार असल्याची घोषणा झाली होती. तब्बल 23 वर्षानंतर 2022 मध्ये 2 सप्टेंबर रोजी भारतीय नौदलाच्या सेवेत युद्धनौका विक्रांत सामील होणार आहे. कमी क्षेत्रात विमानाचं टेक ऑफ आणि लँडिंग करता यावं यासाठी आयएनएस विक्रांतची खास रचना करण्यात आली आहे.

या युद्धनौकेचा पुढच्या भागात चढाव आहे. ज्याला STOBER (शॉर्ट टेक ऑफ बट अरेस्टर लँडिंग डिझाईन) म्हणतात आणि याचा फायदा म्हणजे विमान कमी जागेत सहजपणे टेकऑफ आणि लँडिंग करू शकता येतं. ही युद्धनौका इतकी मोठी आही की तिला युद्धाच्या वेळी लपवणं अशक्य आहे. त्यामुळे शत्रूंचा सामना करता यावा यासाठी त्यामध्ये विषेश सुरक्षा व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

भारतीय नौदलाकडे आयएनएस विक्रांत सोपवण्यात येणारः

भारतीय नौदलाकडे आयएनएस विक्रांत सोपवण्यात येणार असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होणार आहेत. भारताने बनवलेली ही पहिली विमानवाहू युद्ध नौका आहे. 40000 टन विमानवाहू योग्य नौका बनवण्यासाठी सक्षम असलेल्या जगातील सहा देशांच्या मोठ्या देशांच्या यादीत आता भारताचा समावेश झाला आहे. मेड इन इंडिया मोहिमे अंतर्गत विकसित केलेल्या आयएनएस विक्रांत हा भारतासाठी मैलाचा दगड आहे. ही युद्ध नौका म्हणजे समुद्रातील बाहुबली आहे.

15 मजली इमारती इतकी आहे युद्धनौकाः

20000 कोटी खर्चून बांधलेली ही युद्धनौका 53 एकरांवर पसरलेली असून ती 15 मजली इमारती इतकी उंच आहे. सुमारे दोन हजार लोकांना रोजगार देणारी ही युद्धनौका आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 30 वेगवेगळ्या प्रकारची विमान यावकर चालू शकतात आणि त्यामध्ये 2300 केबिन आहेत. आयएनएस विक्रांतची लांबी 262 मीटर आहे आणि जहाजाचं वजन सुमारे 45 हजार टन आहे. या जहाजाची उंची सुमारे 59 मीटर म्हणजेच 15 मजली इमारती इतकी आहे आणि रुंदी 62 मीटर आहे. या युद्धनौकावर 88 मेगावॅट क्षमतेच्या चार गॅस डबल बसवण्यात आले आहेत आणि तिचा कमाल वेग 28 नोट्स इतका आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!