मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं असल्याचं पाहायला मिळतं आहे. यावर्षीच्या हिवाळी अधिवेशनमध्ये धक्का-बुक्कीच्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी खूपच चर्चेत होते. अमोल मिटकरी कोणत्यानाकोणत्या कारणावरून चर्चेत असतातच. अशातच अमोल मिटकरी यांच्यावर कमिशन घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अमोल मिटकरी यांच्यावर कमिशन घेतल्याचा आरोप-
अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका पदाधिकाऱ्याने अमोल मिटकरी कमिशन घेत असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे ही तक्रार केली आहे. अमोल मिटकरी यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक पदाधिकारी जिल्हाध्यक्षांना प्रश्न करत आहे. आम्ही आमदारसाहेबांकडे पैसे देऊन निधी मागतोय.पण आम्हाला निधी दिला नाही, जो जिल्हाध्यक्षांना दिला. तो कशाप्रकारे दिला हे त्यांना कृपा करून विचारा.
पदाधिकाऱ्यानेच केली तक्रार-
तसेच, जिल्हाध्यक्षांकडून त्यांनी 2 लाख रूपये घेऊन त्यांना 20 लाख रूपयांचा निधी दिला गेला. मग आम्हाला निधी का दिला जात नाही?, असा सवाल पदाधिकाऱ्यानी विचारला आहे. अमोल मिटकरी यांच्यावर झालेल्या या आरोपावर अमोर मिटकरी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde । एकनाथ शिंदे मिलिंद नार्वेकरांच्या निवासस्थानी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Shivsena | “नव हिंदुत्ववाद्यांना मंदिरातील हार-फुलांचे वावडे का बरे असावे?”; शिवसेनेचा सवाल
- Sanjay Raimulkar । बोगस डॉक्टर डिग्री प्रकरण भोवणार? संजय रायमूलकर यांच्याविरोधात याचिका दाखल
- Shivsena | “हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात फुलं फक्त मंत्र्यांसाठी, देव कोरडेच!”
- Nana Patole | महाराष्ट्रातलं ईडी, भाजपप्रणित सरकार हे इव्हेंटबाज- नाना पटोले


