मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. मराठवाडा मतदारसंघात सतिश चव्हाण विजयी झाले आहेत, नागपूर पदवीधर मतदारसंघात आघाडीचे अभिजीत वंजारी विजयी झाले आहेत. तर पुणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड यांनी बाजी मारली आहे.
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला आहे. या जागेवर गेली कित्येक टर्म भाजपचा गाजावाजा होता. खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोनदा या मतदारसंघातून निवडून आले होते.
मात्र, यंदा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं तगडं आव्हान भाजपसमोर होतं. भाजपला रोखण्याची शक्कल या तिन्ही पक्षांनी एकत्र येत योग्य पद्धतीने राबविल्याची या निकालातून दिसत आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेल्या पराभावर भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आम्ही नेहमीच निवडून येतो. मात्र यावेळी आम्ही विरोधकांविषयी काहीसे बेसावध राहिलो. यामुळे आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र या निवडणुकीने राज्यात भाजप संपली असे होत नाही. आमचा महाराष्ट्रात कुठलाही गट-तट नाही. या निवडणुकीचे आम्ही निश्चितच विश्लेषण करू. अस सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- तीन भा**ऊ पक्षांनी 2-3 जगा जिंकल्या म्हणजे पराक्रम नाही केला, राणेंची टीका करताना जीभ घसरली
- नवरदेवाने लग्नाची घाई करुन काही होत नाही, घरच्यांनीही मनावर घेतलं पाहिजे; दत्ता मांमाचा भाजपला टोला
- अमर, अकबर, अँथनीनेच रॉबर्ट शेटचा दणदणीत पराभव केला : सचिन सावंत
- नेटफ्लिक्सवर आज मध्यरात्री पासून मोफत पाहता येणार वेब सिरीज ; जाणून घ्या कसे ?
- ‘काँग्रेसवाल्यांनो सत्तेसाठी अजून किती स्वतःचा आणि स्वतःच्या नेत्याचा कचरा करून घेणार?’


