Share

‘काँग्रेसवाल्यांनो सत्तेसाठी अजून किती स्वतःचा आणि स्वतःच्या नेत्याचा कचरा करून घेणार?’

Published On: 

🕒 1 min read

रत्नागिरी : कोणत्याही पक्षामध्ये त्याच्या नेतृत्वाची मान्यता पक्षात आणि लोकांमध्ये किती असते, हे पाहणे महत्त्वाचे असते. आज काँग्रेसमध्ये रँक अँड फ्रँकटी स्थिती लक्षात घेतली तर आजही गांधी-नेहरू परिवाराबाबतची आस्था काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पाहण्यास मिळत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे दोघेही त्यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत आहे.

त्यामुळे बरेच नेते हे त्यांच्या विचारांचे आहेत आणि वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यामध्ये सातत्याचा थोडासा अभाव आहे असे परखड मत लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले.

शरद पवारांच्या याच विधानावरून भाजप नेते निलेश राणे यांनी काँग्रेसवर प्रहार केला आहे. ‘काँग्रेसवाल्यांनो सत्तेसाठी अजून किती स्वतःचा आणि स्वतःच्या नेत्याचा कचरा करून घेणार आहात. तुमच्या प्रमुख नेत्याला तुमचा सहकारी पक्ष किंमत देत नही म्हणजे सत्तेसाठी तुम्ही तुमच्या नेत्याची किंमत करत नाही असा अर्थ होतो.’ असा घणाघात निलेश राणे यांनी ट्विटर वरून केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!