🕒 1 min read
रत्नागिरी : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. दरम्यान, भाजपने काल धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून विजयी सुरुवात तर केली मात्र यात पुढे महाविकास आघाडी भाजपचा विजयी रथ रोखण्यात यशस्वी झाली.
महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर होणारी ही पहिली निवडणूक असल्याने जनता महाविकास आघाडीला कौल देणार का? याची उत्सुकता निर्माण झाली होती. आघाडीला घवघवीत यश मिळालं असून भाजपच्या हक्काच्या नागपूर व पुण्यातील जागांवर देखील आघाडीने झेंडा फडकवला आहे. यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला असून मत देणाऱ्या उच्च शिक्षितांचे आभार मानले आहेत.
भाजपला हा प्रभाव जिव्हारी लागणारा आहे. महाविकास आघाडीच्या विजयावर व त्यांच्या नेत्याच्या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी महाविकास आघाडीवर टीका करताना निलेश राणेंची जीभ घसरली. ‘३ भाडखाऊ पक्ष एकत्र येऊन 2-3 सीट जिंकले म्हणजे त्यांना वाटलं त्यांनी मोठा पराक्रम केला. सोयीची आघाडी एखाद दुसरी निवडणूक जिंकून देईल पण तो विजय ज्यास्त वेळ टिकत नाही. ३ पक्ष एकटे लढले असते तर त्यांची काय अवस्था झाली असती हे वेगळं सांगायला नको म्हणून त्यांनी उड्या मारायची गरज नाही.’ असा घणाघात निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे केला आहे.
३ भाडखाऊ पक्ष एकत्र येऊन 2-3 सीट जिंकले म्हणजे त्यांना वाटलं त्यांनी मोठा पराक्रम केला. सोयीची आघाडी एखाद दुसरी निवडणूक जिंकून देईल पण तो विजय ज्यास्त वेळ टिकत नाही. ३ पक्ष एकटे लढले असते तर त्यांची काय अवस्था झाली असती हे वेगळं सांगायला नको म्हणून त्यांनी उड्या मारायची गरज नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 4, 2020
महत्वाच्या बातम्या
- सर्वस्व पणाला लावणाऱ्या भाजपचं हैद्राबादमध्येही ‘पानिपत’!
- ‘इथून पुढील निवडणुका बॅलेट वर झाल्यास भाजपाला त्यांची खरी पात्रता कळेल’
- आता भाजपची उलटी गिनती सुरू झाल्याचं स्पष्ट झालंय – शशिकांत शिंदे
- पेपरवर लिहून देतो, राज्यात ऑपरेशन लोटस होणार नाही – हसन मुश्रीफ
- अमर, अकबर, अँथनीनेच रॉबर्ट शेटचा दणदणीत पराभव केला : सचिन सावंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

