नागपूर : सध्या कापसाला मिळत असलेला दर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे. आपण पहिले तर हंगामाची सुरवात 6 हजार रुपये क्विंटलपासून सुरु झाली होती. आता अंतिम टप्प्यात कापसाचा दर 11 हजार रुपयांपर्यंत पोहचला आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात विदर्भातील खरेदी केंद्रावर कापसाला सर्वाधिक दर मिळत आहे. मागे कमी दरात शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली आता काही दिवसांमध्येच दर दुप्पट झालेले पाहायला मिळत आहे.
वर्ध्यातील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सेलू येथे तब्बल 10 हजार 900 प्रतिक्विंटल दर मिळाला. विदर्भासह कापूस हे मराठावड्यातील खरीप हंगामातील एक प्रमुख पीक आहे. मात्र, यंदाच्या अतिवृष्टीमुळे तोडणीला आलेल्या कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बाजारपेठेत आवक घटल्यामुळे 6 हजारावरील दर आता जवळपास 11 हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहचलेले आहेत. उत्पादनात झालेली घट ही वाढीव दरामुळे भरुन निघालेली आहे. मात्र, असे असले तरी साठवणूकीतल्या सोयाबीनची विक्री झाल्यानंतर दर अधिक वाढत आहेत. त्यामुळे अधिकचा फायदा हा व्यापाऱ्यांचाच होत असल्याचे चित्र आहे.
4 दिवसांत 700 रुपयांनी वाढ –
10 मार्चपर्यंत खरेदी केंद्रावर कापसाला 10 हजार 200 असा दर होता. मात्र, दिवसागणीस कापसाच्या दरात वाढ होत आहे. 15 मार्च रोजी कापसाचे दर हे 10 हजार 900 रुपयांपर्यंत पोहचले आहेत .
महत्वाच्या बातम्या –


