Share

बाबर आझमला शतकासाठी शुभेच्छा देत अश्विनने केले ट्विट; म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पाकिस्तान-ऑस्ट्रेलियाचा दुसरा कसोटी सामना कराची शहरात खेळवला जात आहे. पाहुण्या संघाने यजमानांसमोर डोंगराएवढे ५०६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने शक्तीप्रदर्शन करत आपल्या संघाची लाज वाचवली. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या डावात २ बाद १९२ धावा केल्या आहेत. बाबर आझमच्या फलंदाजीने भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनचेही मन जिंकले आहे.

पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया मालिकेत यजमानांना कसोटी जिंकण्यासाठी आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेण्यासाठी आणखी ३१४ धावांची गरज आहे. बाबर आझमने (babar azam) सलामीवीर अब्दुल्ला शफीकसोबत तिसऱ्या विकेटसाठी १७१ धावांची नाबाद भागीदारी केली. बाबर आणि शफीक अनुक्रमे १०२ आणि ७१ धावा करत खेळत होते. बाबर आझमच्या शतकी खेळीने भारताचा ऑफस्पिनर अश्विनचाही चाहता बनला आहे. रविचंद्रन अश्विनने (ravichandran ashwin) ट्विट केले की, ‘बाबर आझम शाब्बास, मॅचचा शेवट मनोरंजक होणार आहे.’

सामन्याच्या पाचव्या दिवशी बाबर आझमने पुन्हा धुव्वादार फलंदाजी करत १६८ धावा केल्या. ज्यात १८ चौकरांचा समावेश होता. पाकिस्तान संघाला सामना जिंकण्यासाठी अजून ३१० धावांचा डोंगर सर करावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाचा विजय जवळपास निश्चित असून पाककडे अजूनही ६ विकेट्स शिल्लक आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!