औरंगाबाद : शहरांच्या संभाजीनगर नामकरणासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शहरात दौरा होणार आहे. या दौऱ्याच्या एक दिवस आधीच मनसेने आक्रमक भूमिका घेत क्रांती चौकात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे वाहन अडवून त्यांना जाब विचारला.
संभाजीनगर नामकरण व्हावे यासाठी मनसेने यापूर्वीच अल्टिमेटम दिला होता. अल्टिमेटम संपल्यानंतर रस्त्यावर उतरण्याची भूमिका मनसेने घेतली होती. त्याप्रमाणे आज माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे वाहन अडवून त्यांना जाब विचारण्यात आला. यावेळी संभाजीनगर नामकरण झालेच पाहिजे या आशयाची पत्रकेही खैरे यांच्या अंगावर भिरकावण्यात आली. यावेळी शिवसेना मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्या (शुक्रवार, 5 फेब्रु.) औरंगाबाद दौरा होणार आहे, या दौऱ्याच्या आधीच मनसेने राडा केल्याने शहरात चर्चेचा विषय झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीनं शर्जिलला पळून जाण्यास मदत केली’
- भीती आणि दहशतीमुळे काही प्रमुख लोक शेतकऱ्यांना पाठिंबा देत नाहीयेत : संजय राऊत
- पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही केंद्राच्या हाती; अजित पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर
- “…तेव्हा राष्ट्रभक्तीचा आव आणणारे सर्व सेलिब्रिटी कुठे होते?”
- उत्तरेकडील वाऱ्यामुळे तापमानात घट, परभणीचे तापमान ९.१ अंश

