Share

शरजीलचे वक्तव्य चुकीचे आणि दुर्दैवी – उर्मिला मातोंडकर

Published On: 

मुंबई : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजील उस्मानीवर पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कार्यक्रमाला याआधीच अनेकांनी विरोध केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर एल्गार परिषद ३० जानेवारीला पार पडली होती.

शरजील उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत भाषणाची सुरुवात करतानाच, ‘आजचा हिंदू समाज सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने केली होती.

शरजील उस्मानी यानं हिंदुविरोधी केलेल्या वक्तव्यांनंतर भाजपनं त्याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, यावर अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी भाष्य केले आहे.

उर्मिला यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी गरजू महिलांना उपयोगी वस्तू आणि लहान मुलांना खाऊ वाटप केलं. विलेपार्ले इथे उर्मिला मातोंडकर यांनी स्वत: उपस्थिती राहून, चिमुकल्यांसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शरजील उस्मानी याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘मुळात शब्द हे जपून वापरावे लागतात, त्यामुळे मला असं वाटतं की शरजील नावाच्या इसमाने पुण्यामध्ये हिंदू धर्माच्याविरोधात जे काही शब्द वापरले, ते चुकीचे आणि दुर्दैवी होते. त्याबाबत पोलीस तपास जरुर व्हायला पाहिजे’, असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!