Share

नामांतराचा मुद्दा; मुख्यमंत्री ठाकरेंचीही गाडी अडवणार, मनसेचा इशारा

Published On: 

औरंगाबाद : उद्या, शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. दौऱ्याच्या एक दिवसाआधीच म्हणजेच आज मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवली. तसेच नामांतराच्या विषयावरील पत्रके अंगावर फेकली. यावेळी उद्या मुख्यमंत्री ठाकरे यांची देखील गाडी अडवण्यात येईल असा इशारा दशरथे यांनी दिला आहे.

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याचा अल्टिमेटम मनसेने शिवसेनेला दिला होता. हा अल्टिमेटम संपला तरी राज्य सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने औरंगाबाद येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचाचा एक भाग म्हणून मनसेने क्रांती चौकात चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवून त्यांना घेराव घातला. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या निषेधाची पत्रके खैरेंच्या अंगावर फेकली. तसेच शिवसेना मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या.

औरंगाबादच्या नामांतरावरून आज मनसेने शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवली. त्यांना जाब विचारला आणि त्यांच्या अंगावर पत्रकं फेकून जोरदार घोषणाबाजीही केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच मनसेने राडा केला आहे. त्यामुळे औरंगाबादेत मनसेचे बळ वाढत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!