Share

कॉंग्रेसला सरकार मध्ये शुन्य किंमत आहे, हेच ‘या’ व्हिडिओतून स्पष्ट होतंय – राम कदम

Published On: 

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे देखील मतदान करण्याचा पर्याय/सुविधा उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने कायदा महाराष्ट्र विधानमंडळाने तयार करावा अशा स्पष्ट सुचना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत. नाना पटोले यांनी मतपत्रिकांबाबत सूचना केल्यानंतर विविध नेते प्रतिक्रिया देत आहेत. यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी देखील विविध प्रकरच्या प्रतिक्रिया यावर दिल्या होत्या.

आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त दिली आहे. ‘लोकसभेला भाजपच्या जागा जास्त आल्या आणि इतर पक्षांच्या बोटावर मोजण्याइतक्या आल्या तेव्हा तो राग मशीनवर काढला गेला. निवडणुकीच्या काळात काही भुरटे फिरत असतात. आम्हाला पॅकेज द्या, आम्ही मतं फिरवून दाखवतो, असं हे भुरटे लोक सांगत असतात. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची भूमिका घेतली असू शकते. त्यांना तो अधिकार आहे. आम्हालाही मंत्रीमंडळात चर्चा करण्याचा अधिकार आहे आणि मते मांडण्याचा अधिकार आहे. शेवटी मुख्यमंत्री सगळ्यांची मते एकून घेतील आणि योग्य तो निर्णय घेतील,’ असं अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार यांच्या प्रतिक्रियेवरून भाजप आमदार राम कदम यांनी मात्र काँग्रेसवर बोचरी टीका केली आहे. ‘काँग्रेस पक्षाची लाजिरवाणी परिस्थिती . एकीकडे शिवसेना दररोज हाणते आहे आणि राष्ट्रवादी भीक घालायला तयार नाही. स्वाभिमान आहे की नाही. कॉंग्रेस ला सरकार मध्ये शुन्य किम्मत हेच वरीलव्हिडीओ वरुन स्पष्ट होते.’ असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!