Share

‘इतका वेगवान मुख्यमंत्री देशाच्या इतिहासातही झाला नसेल!’, भाजपचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगडमधील दुर्घटनाग्रस्त तळीये (ता.महाड) गावाला भेट देणार आहेत. मुंबईतून हेलिकॉप्टरने महाड एमआयडीसीला जाणार आहेत. तिथून मुख्यमंत्री मोटारीने तळीयेला पोहोचणार आहे. दुपारी १.३० वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. दुपारी ३.३० वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील. तळीयेला पोहोचल्यावर ते गावकऱ्यांशी संवाद साधतील. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची विचारपूस करतील. त्यानंतर प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतील, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, दुर्घटना घडून २४ तास झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे तळीये गावाला भेट देणार आहेत. त्यातच ते करत असलेला दौरा केवळ दोन तासांचा आहे. यावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. ‘इतका वेगवान मुख्यमंत्री महाराष्ट्राच्याच काय देशाच्या इतिहासात झाला नसेल’ असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांवर विरोधकांकडून टीका
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसामुळे दरड कोसळून आणि पुरामुळे जनजीवन विस्तळीत झाले आहे. या परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळांवर जात नसल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ‘नैसर्गिक अपत्तीच्या काळात राजकारण नको, हातात हात घालू काम केले पाहिजे, हे मान्य आहे. आम्ही त्यासाठी हात द्यायला तयार आहोत, पण सरकारचा हात तर दिसू द्या. सध्या राज्यात पूर परिस्थिती गंभीर बनली असताना मुख्यमंत्री ठाकरे घरात बसून आहेत. त्यांचे मंत्रीही कोठे मदतीला धावले दिसत नाहीत. आम्हाला मात्र राजकारण करू नका म्हणतात’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली शुक्रवारी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!