🕒 1 min read
मुंबई : रायगडमधील तळीयेच्या दुर्घटनेने सगळा महाराष्ट्र हळहळला. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. एका क्षणात डोंगराच्या ढिगाऱ्याखाली आख्खं गाव गाडले गेले. पुण्यातील माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती या दुर्घटनेतून पाहायला मिळाली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावाला भेट देणार आहेत.
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray to leave for the flood-affected Mahad by helicopter, from Mumbai at 12 pm today. He will also visit the flood-hit Taliye village during his visit.
(File photo) pic.twitter.com/VUPBFpex9U
— ANI (@ANI) July 24, 2021
आज दुपारी १२.४५ वाजता दरड कोसळून गाडल्या गेलेल्या महाड तालुक्यातील तळीये गावाला भेट देणार आहेत. मुंबईतून हेलिकॉप्टरने महाड एमआयडीसीला जाणार आहेत. तिथून मुख्यमंत्री मोटारीने तळीयेला पोहोचणार आहे. दुपारी १.३० वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. दुपारी ३.३० वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील. तळीयेला पोहोचल्यावर ते गावकऱ्यांशी संवाद साधतील. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची विचारपूस करतील. त्यानंतर प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतील, अशी माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्र्यांवर विरोधकांकडून टीका
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसामुळे दरड कोसळून आणि पुरामुळे जनजीवन विस्तळीत झाले आहे. या परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळांवर जात नसल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ‘नैसर्गिक अपत्तीच्या काळात राजकारण नको, हातात हात घालू काम केले पाहिजे, हे मान्य आहे. आम्ही त्यासाठी हात द्यायला तयार आहोत, पण सरकारचा हात तर दिसू द्या. सध्या राज्यात पूर परिस्थिती गंभीर बनली असताना मुख्यमंत्री ठाकरे घरात बसून आहेत. त्यांचे मंत्रीही कोठे मदतीला धावले दिसत नाहीत. आम्हाला मात्र राजकारण करू नका म्हणतात’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली शुक्रवारी केली होती.
दरम्यान, रायगड जिल्ह्यात दरडीखालून आतापर्यंत दरडीखालून ४९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. महाड तालुक्यातील हे तळीये गाव नष्ट झाले आहे. महाड तालुक्यात तळीये ३८, पोलादपूर तालुक्यात साखर सुतारवाडी इथं ५ तर पोलादपूर तालुक्यातच केवनाळे इथं ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, साताऱ्यात मिरगावातही दरड कोसळून १२ ठार झाले आहेत. आंबेघरमध्ये १७ जण दरडीखाली अडकल्याची भीती आहे. तर रत्नागिरीतल्या पोसरेत ४ जण ठार झाले असून १३ जण बेपत्ता आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे अनिल परब हे पळकुटे मंत्री’
- दोन मुलांचे धोरण देशभरात राबवणार का?, केंद्राने संसदेत दिले ‘हे’ उत्तर
- ‘डोक्यावर मृत्यू दिसत असूनही नागरिकांना मरणासाठी का सोडले?, भाजपाचा संतप्त सवाल
- ‘राज्यावरील संकटात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा अर्थ म्हणजे ‘मला जमत नाही!’
- ‘राज्यात अतिवृष्टी व महापूराची अभूतपूर्व परिस्थिती’ ; अजित पवारांनी व्यक्त केले दु:ख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
