🕒 1 min read
उस्मानाबाद: एकविसावे शतक सुरु आहे तरी देखील आजही बालविवाह सारख्या प्रथा अनेक ठिकाणी सुरु आहेत. असाच एक बाल विवाह शहरातील शिवनेरी नगरमधील टापरे बिल्डींगजवळ होणार होता, मात्र महिला व बाल विकास विभागाला हा बालविवाह रोखण्यात यश मिळाले आहे. यावेळी त्यांच्या पालकांना समज देण्यात आली असून त्यांच्याकडून शपथपत्र घेण्यात आले आहे.
एका अल्पवयीन मुलीचा शुक्रवारी बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.एच.निपाणीकर यांना मिळाली होती. हा बालविवाह थांबविण्यासाठी उस्मानाबाद येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांना बालविवाह बाबतची माहिती दिली. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती कोमल धनवडे यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी योगेश शेगर व श्रीमती प्रज्ञा बनसोडे, हर्षवर्धन सेलमोहकर यांना बालविवाह थांबविण्यासाठी सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचारी, सरपंच, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक श्री. राठोड आणि पो.कॉ, काटकर, तलाठी यांनी अथक परिश्रम घेऊन तात्काळ बालविवाह थांबविला. या बाल विवाहाचा पाठपुरावा करत सकनेवाडी येथे गुरूवारी सांय. ७.३० च्या जाऊन तेथील हजर पालकांना बाल विवाह अधिनियम २००६ कलम १० व कलम ११ नुसार कायद्याचे उल्लंघन केल्यास २ वर्ष सक्षम कारावास व १ लाख रुपये दंड व सदरील अपराध हा अजामिन पात्र गुन्हा आहे. वधू-वराच्या आई-वडिलास व गावातील रहिवाशांची समजूत काढण्यात आली. त्या संबंधीचे हमीपत्र लिहून घेवून तलाठी यांनी पंचनामा केला. वधुच्या आई-वडिलांना बाल कल्याण समिती समोर हजर राहण्यास सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यावरणाचा समतोल महत्त्वाचा, भाजप आमदाराचा शेतकऱ्यांना सल्ला
- अभिनेत्री यामी गौतमने चाहत्यांना दिला सुखद धक्का, दिग्दर्शकासोबत बांधली लग्नगाठ
- डब्लुटीसी फायनल संदर्भात ‘ब्रेट ली’ची सावध प्रतिक्रीया, म्हणाला…
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
