Share

यश क्षितिजा पलीकडचं! कैलास खासबागेंचा सिक्युरिटी गार्ड ते पोलीस उपनिरीक्षक पदाचा प्रवास

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: जीवनात अनेक कठीण प्रसंग येतात. प्रत्येक क्षणाला घड्याळाच्या काट्याप्रमाणे जीवन आपली परीक्षा घेत असते. मात्र ज्यांचे इरादे मजबूत असतात ते ही परीक्षा एक आव्हान म्हणून स्वीकारतात. आणि असेच लोक इतिहास घडवतात. धाडस, संयम आणि प्रयत्नांची पराकाष्ठाचे ज्वलंत उदाहरण ठेवले आहे.कैलास खासबागे या तरुणाने. सिक्युरिटी गार्ड ते थेट पोलीस उपनिरीक्षक पदाचा (Kailas Khasbage selected for PSI) त्याचा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे.

मजूर म्हणून गवंड्याच्या हाताखाली काम केले, गुराखी, मैदानी सराव करताना दुखापत होऊन १ वर्ष मणक्याच्या त्रासाने अंथरुणास खिळून होते. मैदानी चाचणी अगोदर डेंगूची लागण झाली. नशिबाने जणू थट्टाच मांडली. मात्र या परीक्षेला न जुमानता मेहनत, जिद्द आणि कष्टाने नुकतीच कैलास खासबागे यांनी महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची परीक्षा पास केली आहे. त्यांची नुकतीच PSI पदी निवड झाली आहे. त्यांच्या जिद्दीचे, संयमाचे आणि मेहनतीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

नुकतेच महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) चे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात कैलास खासबागे यांच्या यशाने सर्वांचीच मान उंचावली आहे. त्यांचा थक्क करणारा प्रवास सर्वांपुढेच एक आदर्श निर्माण करत आहे.

महत्वाच्या बातम्या:

“काँग्रेस पक्ष हा बाप आहे”- नाना पटोले

महाराष्ट्र सरकारने विकासाला खीळ घालण्यासाठी पुढाकार घेतला नाही- संजय राऊत

घरकुल योजनेचा डीपीआर केंद्र सरकारने रोखला! हे आहे कारण…

IPL 2022 : काय सांगता..! प्रेक्षकांच्या स्टेडियममधील प्रवेशाबाबत BCCI घेणार ‘असा’ निर्णय!

IPL 2022 : हैदराबादची पराभवानंतरही होतेय चर्चा ; कारण ‘ती’ परतलीये !

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!