भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भंडारा येथे एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर टीका केली. काँग्रेस ही महाविकास आघाडीच्या संसारात फक्त जेवणापुरते आलेले वऱ्हाडी आहेत, असं विधान विखे पाटलांनी केलं होत.
त्याला आता नाना पटोले यांनी प्रतिउत्तर देत काँग्रेस पक्ष हा बाप आहे आणि बापच राहणार असं म्हटलं आहे.