बीड: एकविसाव्या शतकात देखील अजूनही देशाच्या अनेक भागांमध्ये बालविवाह सारखे प्रकार होत आहेत. आता कायद्याने देखील यावर बंदी आणली आहे मात्र तरीही आजही ग्रामीण भागांमध्ये बालविवाह सर्रासपणे सुरु आहेत. असाच एक बालविवाह जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे होत होता. मात्र वेळीच या प्रकारची माहिती मिळताच महिला व बालकल्याण समितीचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी थांबले आणि तिथे होणारा बालविवाह रोखण्यात त्यांना यश आले.
अंबाजोगाई शहरातील अमृतेश्वर चौक कमानीजवळ बालविवाह होत असल्याची माहिती प्राप्त झाली. सोमवारी संशयित ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली असता बालिका अल्पवयीन असल्याचे दिसून आले. वेळीच दाखल झाल्याने बालविवाह थांबवण्यात आला. मुलींच्या आईवडिलांचे बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार जबाब नोंदवून घेतले. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अन्वय अल्पवयीन मुलीचा विवाह होणार नाही याबाबत सूचना देण्यात आल्या.
अंबाजोगाई शहरचे पोलिस निरीक्षक बी. एन. पवार यांनी पालकांकडून जबाब लिहून घेऊन त्यांना समज दिली. तसेच अल्पवयीन बालिकेला बालकल्याण समितीसमोर उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या वेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. एम. हुंडेकर व इतर कर्मचारी उपस्थित होते. बालविवाह प्रकरणात बालविकास प्रकल्प अधिकारी व्ही. डी. यादव यांनी आईवडिलांना मार्गदर्शन केले व समज देण्यात आली. बीड जिल्ह्यातील ग्राम बालसंरक्षण समिती व वार्ड बालसंरक्षण समितीच्या पदाधिकारी मंडळींनी आपल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाहीत यासाठी सतर्क राहावे आणि आपल्या भागातील लोकांना जागृत करावे, अशा सूचना सामाजिक कार्यकर्त्या आशाताई ढाकणे यांनी दिल्या.
महत्वाच्या बातम्या
- ‘वाढीव रक्कम परत करा’, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांचे रुग्णालयांना निर्देश
- अखेर बीसीसीआयने इंग्लंडकडे केली ‘ही’ मोठी मागणी
- ‘आमदार शिंदे केवळ कोविड सेंटरचे उद्घाटन करुन जबाबदारी पार पाडल्याचा आव आणत आहेत’
- अभिनेत्री सुष्मिता सेनच्या लेकीला बॉयफ्रेंडविषयी प्रश्न विचारला असता काय सांगितले पाहा..
- ‘गंगेत प्रेतांचा खच हा राम मंदिराइतकाच महत्त्वाचा मुद्दा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

