Share

‘वाढीव रक्कम परत करा’, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांचे रुग्णालयांना निर्देश

Published On: 

जालना: कोरोना रुग्णांकडून शासन दरापेक्षा जास्तीचे रक्कम घेऊन उपचार काही रुग्णालयांनी केले आहेत. शासन निर्णयानुसार बिले आकारण्याचे बंधन असतानाही जिल्ह्यातील एकूण १२ खासगी रुग्णालयांनी २९१ रुग्णांकडून १७ लाखांचे वाढीव बिल घेतले आहे.परीक्षकांच्या तपासणीत हे प्रकरण समोर आलं. आता ही वाढीव रक्कम येत्या ७ दिवसात परत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील १२ खासगी हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी बैठक घेण्यात आली, या वेळी जिल्हाधिकारी बिनवडे बोलत होते. बिनवडे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालये ही रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत. परंतु खासगी रुग्णालयांनी कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच बिले आकारण्याचे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील प्रत्येक खासगी रुग्णालयात जिल्हा प्रशासनामार्फत बिले तपासण्यासाठी परीक्षक नियुक्त केलेले आहेत. १२ रुग्णालयांनी शासन दरापेक्षा अधिक आकारलेले १७ लाख ५२ हजार ३२७ रुपये २९१ रुग्णांना परत करण्याचे बैठकीत मान्य केले.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांवर अधिक चांगल्या पद्धतीने उपचार व्हावेत यासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकारातून व जिल्हा प्रशासनामार्फत खासगी रुग्णालयांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन तसेच आवश्यक औषधींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होईल, या दृष्टीने सर्व सहकार्य करण्यात येत आहे. यामुळे खासगी रुग्णालयांनीसुद्धा कोरोना काळात रुग्णांना चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा देत शासन नियमानुसारच बिले आकारावीत. काही रुग्णालये रुग्णांना पक्की बिले देण्याऐवजी कच्चे बिले देऊन पैसे स्वीकारत असल्याच्या रुग्ण व नातेवाइकांच्या तक्रारी आहेत. प्रत्येक खासगी रुग्णालयात बिलाची तपासणी करण्यासाठी परीक्षकांची नियुक्ती केलेली आहे. यामुळे उपचारानंतर सुटी देताना बिल तपासणीनंतरच रुग्णांकडून पैसे स्वीकारण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!