🕒 1 min read
मुंबई : उत्तरप्रदेशात गंगा नदीत प्रेतांचा खच आढळून आला आहे. या मुद्द्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य करावं, असे आवाहन शिवसेनेचा खासदा संजय राऊत यांनी केले आहे. गंगा नदीत प्रेतं सापडली. हाही हिंदुत्वाचा मुद्दा आहे. राम मंदिरा इतकाच हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे मोहन भागवत यांनी त्यावर बोलावे, असे ते म्हणाले.
‘उत्तर प्रदेशातील घटनांवरून भाजप-संघ बैठक झाली. सरसंघचालक मोहनराव भागवत आदरणीय आहेत. परखडपणे त्यांनी काही गोष्टींवर मत व्यक्त करावं, अशी आमची अपेक्षा असते. त्यांच्या भूमिकेला आणि मताला या देशात आजही महत्व दिलं जातं. पण गेल्या काही महिन्यांपासून सगळेच गप्प आहेत.
विशेषतः गंगेच्या प्रवाहात हजारो प्रेत वाहून आली, त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले नाहीत. हा विषय हिंदुत्वचा होता आणि राममंदिराइतकाच महत्वाचा होता . त्यावर या देशातील हिंदुत्ववादी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी जनतेला अपेक्षा आहे. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं याबद्दलचं मत व्यक्त केलं पाहिजे’, असे राऊत म्हणाले.
ती फाईल भ्रष्टाचाराची आहे का?
दरम्यान, महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी राजभवनात सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या गोंधळावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मार्मिक शब्दात प्रतिक्रिया दिली. ‘हरवलेली फाईल मिळाली, ही आनंदाची गोष्ट आहे. पण त्या फाईलवर राज्यपाल जेव्हा सही करतील, तेव्हा आम्ही संपूर्ण राजभवनला पेढे वाटू’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ‘फाईलच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने प्रश्न विचारला आहे. फाईलवर वेळेत न होण्यासाठी ती फाईल बोफोर्स, राफेल किंवा कोणत्या भ्रष्टाचाराची आहे का?.
महत्वाच्या बातम्या
- धनगर आरक्षणाचा प्रश्नही पेटणार! ३१ मे रोजी ‘जागर’ करण्याचे गोपीचंद पडळकरांचे आवाहन
- ‘..तेव्हा आम्ही संपूर्ण राजभवनला पेढे वाटू’, संजय राऊतांची मार्मिक प्रतिक्रिया
- ‘प्रियंका, कंगनाला भेटणाऱ्या मोदींना संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही’
- दिलासा! म्यूकरमायकोसिसवरील उपचार सरकारी योजनेतूनच होणार
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
