Share

अखेर बीसीसीआयने इंग्लंडकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. या दरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा मध्येच स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर आली.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय सप्टेंबर महिन्यात आयपीएलचं इंग्लंडमध्ये आयोजन करू इच्छिते, यासाठी त्यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी संपर्कही साधला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजच्या कार्यक्रमात बदल व्हावेत, ज्यामुळे आयपीएलचं आयोजन करण्यात येईल, अशी मागणी बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे केली आहे.

दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीत ९ दिवसांचा कालावधी आहे आणि तो कमी करून तिसरी व पुढील दोन कसोटी सामने आधी खेळवण्याचा प्रस्ताव बीसीसीआयनं तयार केला आहे. त्यामुळे सीसीआयला आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पाच अतिरिक्त दिवस मिळतील. पाच कसोटींसाठीच्या ४१ दिवसांच्या विंडोत बदल केल्यास आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. बीसीसीआयनं ECB कडे विनंती केल्यास आयपीएलसाठी ३० दिवसांची विंडो तयार होऊ शकते आणि आयपीएलचे उर्वरित सामने १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत खेळवले जाऊ शकतात.

भारतीय संघ २ जूनला इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तेथे १८ ते २३ जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये त्यांना न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!