Share

‘आमदार शिंदे केवळ कोविड सेंटरचे उद्घाटन करुन जबाबदारी पार पाडल्याचा आव आणत आहेत’

Published On: 

करमाळा : लसीकरणा अभावी कोरोनाचा ग्रामीण भागात फैलाव वाढला असुन लोकप्रतिधींच्या निष्क्रियपणामुळेच करमाळा मतदार संघातील नागरिक लसीकरणापासुन वंचित राहत असल्याचा घणाघाती आरोप माजी आमदार नारायण पाटील यांनी केला. सोलापुर जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग वाढावा म्हणून जो तो लोकप्रतिनिधी आपल्या परीने पाठपुरावा करत मतदार संघास पर्याप्त लस मिळवून देत असताना करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार संजय शिंदे यांनी मात्र लस मिळवण्यात आपण अपयशी ठरल्याची कबुली प्रसिध्दी माध्यमास दिली. यावर जोरदार हल्लाबोल करत नारायण पाटील यांनी मतदार संघाच्या आरोग्ययंत्रणेवर बोट ठेवत लोकप्रतिनिधी यांच्या कामकाजपध्दतीचा चांगलाच समाचार घेतला.

याबाबत बोलताना पाटील म्हणाले की करमाळा तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना सध्या युध्दपातळीवर लसीकरण होणे गरजेचे आहे. परंतु आमदार शिंदे मात्र केवळ कोविड सेंटरचे उद्घाटन करुन जबाबदारी पार पाडल्याचा आव आणत आहेत. एकीकडे उजनीच्या पाण्यावरुन राजकारण तापले असता जलसंपदामंत्री यांच्या भेटीसाठी मुंबई गाठून आदेश रद्द करण्याचे खोटे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.आज करमाळा मतदार संघात लस व कोविड सेंटरसाठी लागणारे औषधे व सुविधा मागणीसाठी मात्र डोळेझाकपणा केला जात आहे.

आम्ही मान्य करतो की स्वतः आमदार शिंदे हे कोरोनाबाधित होते. या दरम्यानच्या काळात मतदार संघाकडे त्यांचे दुर्लक्ष होणे सहाजिक आहे. पण त्याकाळातही आ. मामांनी घरुनच फोनवर मंत्रीमहोदयाकडे संपर्क साधुन कोरोना नियंत्रण व सुविधांसाठी पाठपुरावा केल्याच्या बातम्या सोशल मीडीयातून झळकतच होत्या. यानंतर कोरोनातुन बरे होऊन आल्यावर आमदार शिंदे यांनी मोठ्या धडाक्यात जेऊर, सावडी आदी आपण ठिकाणी कोविड सेंटर उभारले असल्याचे सांगत काही ठिकाणी उद्घाटनेही केली. आता लसीकरणासाठी काय नियोजन आहे? अजुन किती दिवस हा तालूका लसीकरणापासुन वंचित राहणार आहे ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

पाटील म्हणाले, आज करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात अॅन्टीजन टेस्टसाठी तपासणी किट उपलब्ध नाहीत. सोलापुरहून मोजकीच सामुग्री येतेय आणि तेवढ्यावरच 110 गावांच्या तपासणीचा ताण पडतोय. लोकप्रतिधीचीही जबाबदारी तेवढीच आहे. आरोग्ययंत्रणेला हाताला धरुन राजकारण करणे कुठे तरी थांबले पाहीजे.करमाळा तालुक्यातील जनता संकटात असताना श्रेयवादासाठीचा केविलवाणा प्रयत्न न करता आता तरी युध्दपातळीवर प्रयत्न करुन लसीकरणाचा वेग वाढवावा. करमाळा तालूका हा अहमदनगर, पुणे व उस्मानाबाद जिल्ह्यांच्या सीमारेषेवर असलेला तालूका आहे. कोरोना फैलाव वेळेवर रोखला नाहीतर मोठ्या प्रमाणावर लोकांना कोरोनाचा सामना करावा लागेल.

सन 2014 ते 2019 दरम्यान आपण मतदार संघातील आरोग्ययंत्रणेस मुलभुत सुविधा मिळवून देण्यासाठी काही ठळक कामे केली.आज त्या कामांचा उपयोग होत आहे. करमाळा उपजिल्हा रुग्णालय असो वा जेऊर ग्रामीण रुग्णालय असो दोन्ही ठिकाणी आरोग्य सोयीसुविधांसाठी कामे केली. ग्रामीण भागात आरोग्यकेंद्र उभारणीस चालना दिली, पण याचा गवगवा नाही केला. आम्हाला श्रेय नकोय तर मतदार संघातील सर्वसामान्य माणसास आरोग्यसंरक्षण हवेय. आम्ही सुध्दा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे करमाळा मतदार संघातील नागरिकांसाठी लस उपलब्ध व्हावी म्हणून मागणी केली आहे व या कालावधीत आरोग्यकेंद्र तसेच कोविड सेंटर यांना लागणारी औषधे व सोयी सुविधा, उपकरणे आदिसाठी जिल्हाप्रशासन व जिल्हापरिषद यांचेकडे मागणी केली असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!