Share

अभिनेत्री सुष्मिता सेनच्या लेकीला बॉयफ्रेंडविषयी प्रश्न विचारला असता काय सांगितले पाहा..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिने अनेकचित्रपटांमध्ये काम केल आहे. एकेकाळी तिची लोकप्रियता देखील अधिक होती. तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेकजण घायाळ झाले. तीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सद्य सुष्मिता चित्रपट सृष्टीपासून दूर असल्याचे दिसत आहे. मात्र सुष्मिताची मोठी लेक रेनी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. नुकताच रेनीने इन्स्टाग्रामवरील ‘Ask Me Anything’ द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यामध्ये अनेकानी तिला लव्ह लाईफ बद्दल विचारले आणि यावर तिने उत्तर देखील दिल आहे.

तसेच अनेक चाहत्यांनी तिला अभिनेत्री होण्याची इच्छा आहे का असे अनेक प्रश्न विचारले. एका नेटकऱ्यांने रेनीला बॉयफ्रेंड आहे का? असा प्रश्न  विचारला त्यावर सिंगल असल्याचे तिने उत्तर दिले. सध्या कामावर लक्ष असल्याचेही ती म्हणाली. दुसऱ्या नेटकऱ्याने एक्स बॉयफ्रेंडविषयी प्रश्न विचारला असता या गोष्टीवर चर्चा करण्यात काही अर्थ नसल्याचे तिने सांगितले. तर आणखी एकाने तिला भविष्यातील बॉयफ्रेंडवर प्रश्न विचारला तर रेनी म्हणाली, मला टाइम ट्रॅव्हल करण्याची संधी मिळाली असती तर मी याचं उत्तर देऊ शकली असती, अशी परखड उत्तर देत तिने नेटकऱ्यांची बोलती बंद केलीआहे.

https://www.instagram.com/p/CHkVCKCgquy/?utm_source=ig_embed&ig_rid=c5a6d549-876c-409b-9dc0-5e144738909d

सध्या रेनी बॉलिवूडमध्ये करिअर करण्याची तयारी करत आहे. ‘सुतबाजी’ या शॉर्ट फिल्ममधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. या वर्षाच्या सुरूवातीला एका मुलाखतीत रेनीने खुलासा केला की सुष्मिता सेनची मुलगी असणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आपल्याला आईमुळे ऍक्‍टिंगचा वारसा मिळाला आहे, हे तिला मान्य आहे. पण जर काम प्रामाणिकपणे केले नाही, तर ते योग्य होणार नाही. आईच्या वशिल्यामुळे काम मिळवणे तिला पसंत नाही. आपले काम आपल्याला चांगले यायलाच पाहिजे, असे तिला वाटते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!