Share

दिल्लीतील घटनेवर सुब्रमण्यम स्वामी यांचं मोठं वक्तव्य !

Published On: 

दिल्ली : प्रजासत्ताक दिनी अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले असताना शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटकांनी राजधानी दिल्लीमध्ये धुडगूस घातला. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला वेगळे वळण लागले.देशाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न काल केला.

या झालेल्या घटनेवर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले कि, दबक्या आवाजात एक चर्चा सुरू आहे. कदाचित त्यात काहीही तथ्य नसेल. ते खोटेही असू शकेल किंवा शत्रूंच्या आयटी सेलकडून वावड्या उठवल्या जात असतील की, ‘पीएमओ’च्या जवळील व्यक्तीने लाल किल्ल्यावरील हिंसाचाराला खतपाणी घालण्याचे काम केले. नीट तपासून माहिती घ्यावी’.

चिघळलेल्या शेतकरी आंदोलनात सामील असलेला आरोपी दीप सिद्धू हा भाजप खासदार सनी देओल यांच्या निवडणूक प्रचारात सहभागी झाला होता, अशा आशयाचं ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी रिट्विट केलं आहे. यामुळे आता भविष्यात सुब्रमण्यम स्वामी कोणती भूमिका घेत आहेत हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

तसेच दिल्लीतील शेतकरी आंदोलन पेटणे हे सरकारचं अपयश अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर येत असतानाच हरियाणातील शेतकरी नेते गुरणाम सिंह यांनी पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याच्यावर आंदोलनामध्ये हिंसाचार घडल्याचा आरोप केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!