Share

तासगावच्या उपनगराध्यक्षपदी दत्तात्रय रेंदाळकर यांची एकमताने निवड; शहरात जल्लोष

Published On: 

राजू थोरात, तासगांव : तासगाव नगरपालिकेत भाजप खासदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची एक हाती सत्ता आहे. गेल्या चार वर्षापासून उपनगराध्यक्षपदी दिपाली दिग्विजय पाटील ह्या होत्या. पुढील एक वर्षासाठी उपनगराध्यक्षपदी दत्तात्रय आप्पा रेंदाळकर यांची एक मताने निवड केली.

दि. 27 रोजी सकाळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्याकडे दत्तात्रय आप्पा रेंदाळकर यांनी आपला अर्ज दाखल केला. त्या ठिकाणी अन्य कोणत्याही नगरसेवकांनी अर्ज दाखल केला नाही. त्यानंतर नगरपालिकेच्या स्वर्गीय आर आर आबा पाटील सभागृहामध्ये भाजप व राष्ट्रवादीचे नगरसेवक यांच्या उपस्तिथित नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत व नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज आल्याने दत्तात्रय आप्पा रेंदाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे असे घोषित केले.

मावळत्या उपनगराध्यक्ष दिपाली पाटील यांनी प्रथम खासदार संजय काका पाटील यांचे आभार मानले व म्हणाल्या, ‘तासगावच्या जनतेने व नगरपालिकेतील भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवक-नगरसेविका यांच्यामुळेच मी चार वर्ष उपनगराध्यक्षपदी राहुशकले. चार वर्षात सर्वांना सोबत घेऊन तासगाव शहराचा चेहरा-मोहरा बदलून विकास कामे केली.’

तर नगरसेवक किशोर गायकवाड आभार व्यक्त करताना म्हणाले की, ‘सभागृहातील सर्वच माझे सहकारी यांच्यामुळेच तासगावचा चेहरा-मोहरा बदलला. खासदार संजय पाटील यांच्या अथक प्रयत्नातून शहरात अत्याधुनिक शाळा होत आहेत. तसेच शहरात नगरपालिकेची सुसज्ज इमारत व नगरपालिकेचा सुसज्ज दवाखाना ही होत आहे याचे सर्व श्रेय सर्व नगरसेवकांचे आहे. येणाऱ्या निवडणुकीपर्यंत सर्वांनी एकोपा राखत अजूनही तासगाव शहराचा विकास करू.’

या कार्यक्रमाला उपस्थित संजय पाटील यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत पाटील, राहुल सोनवणे, नगराध्यक्ष डॉक्टर विजय सावंत, मावळत्या उपनगराध्यक्ष दिपाली पाटील, नगरसेविका निर्मला पाटील नगरसेवक अभिजीत पाटील,नगरसेविका पद्मिनी जावळे,नगरसेवक तानाजी पवार,नगरसेविका रोहिणी शिरतोडे ,पक्षप्रतोद जाफर मुजावर, नगरसेवक किशोर गायकवाड सर ,नगरसेविका मंगल मानकर, पुनम सूर्यवंशी, नगरसेवक अनिल कुत्ते, नगरसेविका सादिया शेख, राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद बाळासाहेब सावंत, नगरसेवक संतोष बेले, नगरसेविका सुनंदा पाटील, नगरसेवक वैभव भाट, नगरसेविका प्रतिभा लुगडे, नगरसेवक सुभाष देवकुळे, नगरसेविका सारिका कांबळे, नगरसेविका रूपाली गावडे, नगरसेवक सचिन गुजर, बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते

नूतन उपनगराध्यक्षपदी दत्तात्रय रेंदाळकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया

‘सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील यांचे मी प्रथम आभार मानतो त्यांच्यामुळेच मी नगरसेवक झालो आज उपनगराध्यक्षपदी निवड करून त्यांनीच मला खुर्चीवर बसवले. गेल्या चार वर्षात प्रभाग 10 मध्ये कोट्यावधीची काम केले, गणेश काँलनी येथे साने गुरुजी उद्यान, भिलवडी नाकातील पुल, तसेच माझ्या प्रभागात जिम, मळे भागातील रस्ते, विविध विकास कामे केली त्याच जोरावर खासदार संजय पाटील यांनी माझी उपनगराध्यक्षपदी निवड केली. यापुढील काळात सर्व नगरसेवकांना व नगरपालिकेतील अधिकारी-कर्मचारी यांना सोबत घेऊन तासगाव शहराचा विकास करून चेहरा मोहरा बदलू.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!