मुंबई : ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प’ या शासकीय पुस्तकाचं आज मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी नेते हजर होते.
गेली अनेक दशके महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटलेला नाही. कर्नाटकच्या सीमाभागात अनेक मराठी भाषिकांना गळचेपी सहन करावी लागत आहे. त्यांच्यावर अनेक प्रकारे अन्याय केला जातो. या मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सहभागी व्हायचं आहे. मात्र, त्यांचा हा अनेक दशकांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. यावरच हे पुस्तक आधारित आहे.
या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी शरद पवार यांनी देखील सीमाप्रश्नावर भाष्य केलं. ‘विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितल्याप्रमाणे इतर विषयांवर आमची मते भिन्न असली तरी सीमाभागातील बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्र एकत्र आहे, हे दाखवण्याची आता वेळ आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने लोकांसमोर सीमाप्रश्नाचा हा इतिहास मांडला जातोय यासाठी मी डॉ. दीपक पवार यांना धन्यवाद देतो.’ असं म्हणत शरद पवारांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याला व भूमिकेला समर्थन दर्शवलं आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी आंदोलनातील जुन्या आठवणी देखील यावेळी जागवल्या आहेत. ‘आजही सीमाभागातील नागरिक नोव्हेंबरमधील एक दिवस काळा दिवस म्हणून साजरा करतात. महाराष्ट्रातूनही अनेक भागातील लोक या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. राज्यात महाराष्ट्र एकीकरण समिती गठीत करण्यात आली. माझ्यासह एस. एम. जोशी, स्व. बाळासाहेब ठाकरे, प्रा. एन. डी. पाटील, छगन भुजबळ असे नेते या समितीत होते. समितीच्या वतीने मीदेखील सीमाभागात जाऊन आंदोलन केले होते.’ असं त्यांनी सांगितलं.
विरोधी पक्षनेत्यांनी सांगितल्याप्रमाणे इतर विषयांवर आमची मते भिन्न असली तरी सीमाभागातील बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्र एकत्र आहे, हे दाखवण्याची आता वेळ आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने लोकांसमोर सीमाप्रश्नाचा हा इतिहास मांडला जातोय यासाठी मी डॉ. दीपक पवार यांना धन्यवाद देतो. pic.twitter.com/VdqadHXdRx
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 27, 2021
महत्वाच्या बातम्या
- महाभारताचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र
- मुंबई लोकल २९ जानेवारी किंवा १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याची शक्यता – महापौर
- प्रजासत्ताक दिनी ‘महाराष्ट्र देशा’च्या औरंगाबाद कार्यालयाचे शानदार उद्घाटन
- शिवसेनेचा भाजपला आणखी एक धक्का; भाजपच्या माजी सचिवाने मातोश्रीत बांधलं शिवबंधन !
- शेतकरी आंदोलन फुटीच्या उंबरठ्यावर ? व्ही एम सिंह यांच्या गटाची आंदोलनातून माघार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

