बीड:- अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीसाठी अनेकजण आर्थिक मदत करत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाने राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. मंदिराच्या बांधकामासाठी अनेकजण मदतीचा हात करत आहेत. सूरतच्या एका व्यापाऱ्याने तर तब्बल 11 कोटी रुपये राम मंदिराच्या बांधकामासाठी दिले आहेत.
दरम्यान, राम मंदिरासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पाच लाख रुपयांचा निधी दिला आहे. माजलगाव येथील मंगळवारी एका कार्यक्रमात त्यांनी निधीचा धनादेश संकलकांकडे सुपूर्द केला. राम मंदिर निर्माणासाठी जिल्हयातून जास्तीत-जास्त निधी संकलन करावे असे आवाहन मुंडे यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.
प्रभु श्रीराम के अयोध्या में होनेवाले भव्य मंदीर के लिए हमारी भक्ती की एक ईट.. 5 लाख की राशी मर्यादापुरुषोत्तम के प्रति श्रद्धा के रूप मे मंदिर निर्माण में समर्पित करती हूं!! pic.twitter.com/DB1XBvs5sf
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 26, 2021
राम मंदिर उभारणीसाठी अनेक दिग्गजांनी देणग्या दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाच लाखाचा धनादेश दिला होता. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर निर्माण करण्यासाठी 1 लाख 11 हजार रुपयांचा चेक दिलेला आहे. तर, भाजप खासदार आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्याकडून राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाभारताचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र
- मुंबई लोकल २९ जानेवारी किंवा १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याची शक्यता – महापौर
- प्रजासत्ताक दिनी ‘महाराष्ट्र देशा’च्या औरंगाबाद कार्यालयाचे शानदार उद्घाटन
- शिवसेनेचा भाजपला आणखी एक धक्का; भाजपच्या माजी सचिवाने मातोश्रीत बांधलं शिवबंधन !
- आता सरकार आंदोलकांशी चर्चा करणार का ? जावडेकर स्पष्टपणे म्हणाले….


