🕒 1 min read
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेतासुबोध भावेने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बायोपिकमध्ये उत्तम भूमिका बजावल्या आहेत. प्रेक्षकांनी सुबोध भावेंच्या या भूमिकांना प्रचंड पसंती दिली आहे. मराठी सिनेसृष्टीत त्यांनी स्वतः ची अशी एक खास ओळख निर्माण केली आहे. नुकतेच सुबोध भावेने शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
https://www.instagram.com/p/CT6PBMpN70T/?utm_source=ig_web_copy_link
सुबोधने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. हि पोस्ट चर्चेचा तसेच आत्मचिंतनाचा विषय बनली आहे. सुबोधने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये एक वानर आपल्या तोंडाला मास्क लावून बसलेला दिसत आहे.या पोस्टद्वारे त्याने चाहत्यांना महत्वाचा संदेशही दिला आहे. ‘यांनाही कळतं, असे कॅप्शन देखील यावर दिले आहे.
ही पोस्ट करत सुबोधने कोरोना नियम न पाळणाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मागील वर्षापासून कोरोनाचे सावट पसरले आहे. यामुळे २ वेळा लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यातच गणेशोत्सवानिमित्त देखील लोक विनामास्क फिरत आहे. यावरून आता सुबोधने ही पोस्ट शेअर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई : ‘सेरो सर्वेक्षणा’त ८६.६४ टक्के नागरिकांमध्ये आढळून आल्या अॅण्टीबॉडीज्
- ‘भाजपात एकमेव मोदींचा चेहरा, बाकी सारे नाचरे मुखवटे’ शिवसेनेची टीका
- ओबीसी राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार सुप्रीम कोर्टात, 23 सप्टेंबरला सुनावणी
- कोविड उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील GST ची सवलत येत्या 31 डिसेंबरपर्यंत वाढवली
- मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; रेल्वेची सुरक्षा वाढवली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
