Share

कर्नाटक बुरखा बंदी (हिजाब) प्रकरण: मुख्यमंत्री बोमई यांनी दिले विद्यार्थ्यांना आदेश

Published On: 

🕒 1 min read

बेंगळुरू : कर्नाटकात सुरू असलेला मुस्लिम विद्यार्थिनींच्या शालेय गणवेशाचा मुद्दा आता कर्नाटक उच्च न्यायालयात गेला आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी विद्यार्थ्यांना कोर्टाचे पुढील आदेश येईपर्यंत राज्य शासनाच्या नियमांचे आदर राखत शालेय गणवेशाचे पालन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच पुढील आदेश येईपर्यंत शांतता राखण्याचे देखील आवाहन केले आहे.

बोमई सध्या दिल्लीत मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेसाठी पक्ष्यांचा मुख्य नेत्यांना भेटण्यास गेले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी या विषयावर बोलण्यास नकार दिला. प्रकरण सध्या न्यायालयात न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, त्यावर मी काही बोलणार नाही असे त्यांनी म्हंटले.  तसेच फेब्रुवारी ५ च्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी गणवेश घालावा व निर्णयाची वाट पहात शांतता राखावी असे आपल्या संदेशात बोमई यांनी सांगितले.

मागील काही दिवसात उडीपी येथील एका शाळेत सहा विद्यार्थिनींना बुरखा (हिजाब) घातल्याने प्रवेश नाकारला होता. त्यांनी त्याविरोधात शाळेच्या दारात बसून न्याय मागितला. हे प्रकरण वाऱ्यासारखे संपूर्ण उडीपी मध्ये पसरले आणि इतर हिंदू विद्यार्थ्यांनी भगवी शाल गळ्यात घालत शाळेत प्रवेश केला. त्यामुळे संपूर्ण शाळेचे वातावरण दूषित होऊन एक धार्मिक तेढ विद्यार्थ्यांमद्धे निर्माण झाली.

सोमवारी (०७ फेब्रु.) या प्रकरणी कुंडपूरा येथील एका कनिष्ठ महाविद्यालयाने हिजाब घातलेल्या २२ विद्यार्थिनींना वेगळ्या वर्गात बसून शिकण्याच्या अटीवर प्रवेश दिला आहे. तर याप्रकरणी ऊडीपी येथील मुस्लिम विद्यार्थ्यांनी या बुरखा बंदी मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले असून ही बंदी भारतीय राज्यघटनेने दिलेल्या धार्मिक स्वतंत्र्याच्या विरोधात असून ते त्याचे उल्लंघन आहे असे म्हटले आहे. न्यायालयाने या प्रकरणी ८ फेब्रुवारी ही सूनवणीची तारीख दिली आहे.

दि. ५ फेब्रुवारी रोजी, कर्नाटक राज्य शासनाने एक आदेश जारी करत, महाविद्यालयांना गणेवेशासंबंधी आदर बाळगण्याचे सांगितले आहे तसेच कर्नाटकातील काही महाविद्यालयांनी बुरख्यावर बंदी घालत हा निर्णय विद्यार्थ्यांचे मूलभूत हक्कांचे उल्लंघन करत नसल्याचा दावा केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!