Share

“तीन महिने उठला नाही पाहिजे असा मारण्याचा कट होता”, किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

Published On: 

पुणे: पुणे महापालिकेत भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांना शिवसैनिकांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर (attack on BJP leader Kirit Somaiya in Pune Municipal Corporation) राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. किरीट सोमय्या यांना रुग्णलायातून डिस्चार्ज मिळाला असून त्यांनी यानंतर दिलेल्या मुलाखतीत “तीन महिने उठला नाही पाहिजे असा मारण्याचा कट होता”, असा आरोप केला असून संजय राऊत, अनिल परब, ठाकरे परिवार आणि रश्मी ठाकरेंच्या भावाचा यामध्ये सहभाग असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या १५ दिवसांपासून खूप अस्वस्थ आहेत. कारण संजय राऊतांच्या निकटवर्तीयांचे सगळे पुरावे सापडले आहेत. अनिल परब यांच्यावर कारवाई सुरुही झाली आहे. त्यामुळे संजय राऊत,अनिल परब, ठाकरे परिवार आणि रश्मी ठाकरेंच्या भावाचा यात सहभाग सापडला असून त्यांनी ठरवून हे केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

तसेच किरीट सोमय्यांचे हात पाय तोडा, दोन-चार महिने उठले नाही पाहिजेत असा आदेशही होता. हीच सूचना पोलीस आयुक्त आणि शहराध्यक्षांनाही दिली होती. अमिताभ गुप्ता हे तेच पोलीस आयुक्त आहेत ज्यांनी राकेश वाधवानला पळवून लावलं होतं. सगळे व्हिडीओ पाहिल्यानंतर आणि सीआयएसएफच्या अहवालातही पुणे पोलीस, महापालिकेतील सुरक्षा कर्मचारी आणि शिवसेना हायकमांडने मिळून रितसर कट रचला असल्याचं समोर आले आहे, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.

तसेच १०० लोक आत कसे काय गेले? आत गेल्यानतंर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आम्हाला गेटवर सांगितलं का नाही. बिल्डिंगच्या आत सगळे लपले होते. उद्धव ठाकरे इतके घाबरले आहेत की,आता मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात खून, हत्या घडवत आहेत. असा संतापही किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!