Share

“लता मंगेशकर यांचे शिवाजी पार्कात स्मारक बांधा”, राम कदमांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे काल (६ फेब्रुवारी ) निधन झाले. त्यांच्यावर मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी यावेळी उपस्थिती लावली. दरम्यान भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र (BJP MLA Ram Kadam letter to Chief Minister Thackeray) लिहून “लता मंगेशकर यांचे शिवाजी पार्कात स्मारक बांधा”, अशी मागणी केली आहे.

आपल्या पत्रात राम कदम यांनी म्हटले आहे की, “भारतरत्न दिवंगत स्वर्गीय लता दिदी यांच्यावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे त्याच जागी शिवाजी पार्कावर गानकोकिळा भारतरत्न स्वर्गीय लतादिदी यांचे स्मृतीस्थळ उभारून ( Ram Kadam demand for construction of Lata Mangeshkar memorial)त्यांच्या स्मृती कायमस्वरुपी जतन कराव्यात ही नम्र विनंती मी कोट्यवधी संगीतप्रेमी आणि लतादिदींच्या चाहत्यांच्या वतीने करत आहे. तरी तातडीने त्यांच्या विनंतीचा, भावनेता सन्मान करावा आणि त्याच ठिकाणी जगाला प्रेरणा देणारे स्मृतीस्थळ उभारावे.”

दरम्यान पत्राच्या शेवटी त्यांनी लतादिदी चाहता व आमदार, भाजपा असेही लिहिले आहे. तसेच स्वर्गीय लतामंगेशकर यांचा   अंत्यसंस्कार झाला त्या शिवाजी पार्कमध्ये स्मृतीस्थळ बनवावे ही मागणी संपूर्ण देशाची नव्हे तर जगातील कोट्यावधी संगीत प्रेमी आणि लता दीदीच्या चाहत्यांची आहे. असेही राम कदम यांनी म्हटले आहे. दरम्यान आज ठाकरे सरकारने लता मंगेशकर यांच्या निधनामुळे शासकीय सुट्टी काहीर केली आहे. आता राम कदम यांची मागणी मुख्यमंत्री ठाकरे मान्य करतील, की नाही ते लवकरच कळेल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!