Share

राम कदम यांच्या पत्रावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले,‘लतादीदींचे स्मारक बनवणे…’

Published On: 

मुंबई : स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आवाज कायमचाच हरपला असून काल(६ फेब्रु.) रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या स्वरांनी संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांचं मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. तद्पश्चात भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत शिवाजी पार्कमध्ये लता मंगेशकर यांचे स्मारक उभारावे अशी मागणी केली आहे. दरम्यान, राम कदम यांच्या या पत्रावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘लतादीदींच्या स्मारकाविषयी काही जण बोलत असले तरी त्याचे स्मारक बनवणे सोपे नाही. त्या काही राजकारणी नव्हत्या. परंतु ते एक असे व्यक्तीमत्व होते की त्याचे स्मारक करणे सोपे नाही. त्या स्वत: एवढ्या मोठ्या व्यक्ती होत्या की देशालाही विचार करावा लागेल त्यांच्या स्मारकाबद्दल’, असे राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, आपल्या पत्रात राम कदम म्हणाले आहेत की,‘भारतरत्न दिवंगत स्वर्गीय लता दिदी यांच्यावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे त्याच जागी शिवाजी पार्कावर गानकोकिळा भारतरत्न स्वर्गीय लतादिदी यांचे स्मृतीस्थळ उभारून त्यांच्या स्मृती कायमस्वरुपी जतन कराव्यात ही नम्र विनंती मी कोट्यवधी संगीतप्रेमी आणि लतादिदींच्या चाहत्यांच्या वतीने करत आहे. तरी तातडीने त्यांच्या विनंतीचा, भावनेचा सन्मान करावा आणि त्याच ठिकाणी जगाला प्रेरणा देणारे स्मृतीस्थळ उभारावे’, असे कदम म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!