🕒 1 min read
मुंबई: सोशल मीडियावर दहावी आणि बारावीची परीक्षा राज्य सरकार ऑनलाईन घेणार आहे अशी अफवा ‘हिंदुस्थानी भाऊ’ नामक तरुणाने पसरली होती. मात्र या अफवेमुळे राज्यभरातील विद्यार्थी आक्रमक झाले असून राज्यभर आंदोलन (students agitation all over the state) केले जात आहे.
नागपूर, अकोला, औरंगाबाद आणि पुण्यासह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान या व्हिडिओनंतरच विद्यार्थी आक्रमक झाल्याचं बोललं जात आहे.
हिंदुस्थानी भाऊने व्हिडिओत काय म्हटले?
दोन वर्षांत कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे देखील मृत्यू झाले आहेत. या धक्क्यातून कुटुंब अजून सावरलेले नाही. आता ओमिक्रॉन आला आहे. स्वतः सरकार म्हणतेय की घरात राहा, काळजी घ्या. मग सरकार विद्यार्थ्यांचा बळी का देत आहे? प्रोफेसर ऑनलाइन बैठक घेत आहेत. तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी आहे, तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का? असा सवाल हिंदुस्थानी भाऊने (student aggression After the rumor of Hindustani Bhau)त्याच्या व्हिडिओतून केला आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन का? विद्यार्थ्यांच्या जीवासोबत खेळू नका. त्यावेळी मी एकटा रस्त्यावर उतरलो होतो. आता देखील तुम्हाला विनंती करत आहे की विद्यार्थ्यांसोबत खेळू नका. तेव्हा मी एकटा रस्त्यावर उतरलो होतो आता लाखो विद्यार्थ्यांसोबत उतरणार, असा इशाराही हिंदुस्थानी भाऊने दिला होता.
वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया-
मात्र या व्हिडिओमुळे सध्या राज्यभरात विद्यार्थ्यांकडून आंदोलन केले जात आहे.तर यावरच दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात कुणीतरी खोटी बातमी पसरवली होती. विद्यार्थी, पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेऊ नये. परीक्षा ज्या तारखेला आहेत त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत असे वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad) यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…मग आशिष शेलार आणि अतुल भातखळकरांना गुजरात पेंग्विन म्हणायचे का?”, किशोरी पेडणेकरांचा सवाल
- “…तुमच्या शापाने कावळाही मरणार नाही”, राऊतांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर
- गांधींबाबत अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण यांना ‘गोडसे-आपटे भारतरत्न’ पुरस्कार; हिंदू महासभेनं केलं सन्मानित!
- “केवळ महसुलासाठी मद्य विक्रीला प्राधान्य देणे हे जनतेचं दुर्दैव”, अण्णांनी साधला ‘मविआ’वर निशाणा
- औरंगाबादेतील ‘बायको पाहिजे’ बॅनर प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल; रुपाली चाकणकर म्हणाल्या..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
