Share

औरंगाबादेतील ‘बायको पाहिजे’ बॅनर प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल; रुपाली चाकणकर म्हणाल्या..

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: ‘निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे’ या औरंगाबाद लावण्यात आलेल्या बॅनरची सध्या राज्यभरात चांगलीच चर्चा रंगली आहे. हे बॅनर महाराष्ट्रभर व्हायरल झाले आहे. आता राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अध्यक्ष रुपाली चाकणकर(Rupali Chakanakar) यांनी ट्विट करून या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. औरंगाबादेत महिला भाजपच्या वतीनेही या पोस्टरवर शाईफेक करत, पोस्टर फाडण्यात आले.

औरंगाबाद शनिवारी रात्री पासून लागलेल्या एका बॅनरने चांगलीच प्रसिद्धी मिळवली. शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हे बॅनर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. ‘निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे’ शहरातील मुख्य ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. मुख्यत्वे करून यामध्ये जातीची कुठलीही अट नसून आपल्याला तीन मुले असल्या कारणाने आपण निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे लढाऊ उमेदवार पाहिजे असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला होता.

रमेश विनायकराव पाटील यांनी शहरातील वर्दळीच्या तीन ठिकाणी हे बॅनर लावले होते. राज्य महिला आयोगानेही शहरातील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या, निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे अशी जाहिरात फलक औरंगाबाद शहरात झळकले. याप्रकारची बातमी प्रसार माध्यमातून प्रसारित होत आहे, सदर फलक अतिशय गंभीर स्वरूपाचे व महिलांचा अवमान करणारे आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असुन, याप्रकरणी औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!