नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित आज दिल्ली मेट्रोच्या मॅजेंटा लाईनवर भारतातली पहिली विनावाहक मेट्रो रेल्वे गाडी धावणार आहे. यामुळं प्रवासातल्या नव्या सुविधेचं युग सुरू होणार आहे. विना वाहक तंत्रज्ञानामुळं संभाव्य मानवी चूक टाळता येणार आहे. दिल्ली मेट्रोच्या पिंक लाईनवर पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत विनावाहक मेट्रो रेल्वे सुरू करण्याचं नियोजन आहे.
दिल्ली मेट्रोच्या म्हणण्यानुसार, या नव्या पिढीच्या गाड्या चालविण्यामुळे दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (डीएमआरसी) जगातील अशा सात टक्के मेट्रो नेटवर्कच्या विशेष गटात समाविष्ट होणार आहे ज्या चालकरहित परिचालन सेवा पुरवत आहेत. मेट्रो सेवेसोबतच पंतप्रधान ‘एअरपोर्ट एक्स्प्रेस लाईन’वर ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) सेवादेखील सुरु करणार आहेत.
दरम्यान, मोदी किसान रेल्वे महाराष्ट्रातल्या सांगोला ते पश्चिम बंगालमधल्या शालीमार या मार्गावरील 100 व्या किसान रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी साडे चार वाजता हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
या रेल्वेच्या डब्यांमधून फुलकोबी, सिमला मिरची, शेवगा, मिरची आणि कांदा या भाज्यांसह द्राक्ष, संत्र, डाळींब, केळ आणि सीताफळ या फळांची वाहतूक केली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भारतात राहुल गांधी यांची सुटी संपली आहे आणि ते आज इटलीला परत गेलेत’
- क्या दाल मे कुछ काला है ? राम कदमांनी काढला संजय राऊत यांना चिमटा
- महाविकास आघाडी कुणालाही घाबरत नाही; ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित : आदित्य ठाकरे
- ‘कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय’
- काँग्रेसच्या आमदारांनी घेतली अमित शाह यांची भेट; दोन आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता


