🕒 1 min read
इस्लामपूर:- गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
कॉंग्रेस व समविचारी पक्ष शेतकरीविरोधी भूमिका घेत आहेत. जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. केंद्राने केलेले कायदे हे शेतकऱ्यांना बाजाराचे मालक बनवणारे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही शेतकऱ्यांविरोधात निर्णय घेणार नाहीत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शेतकरी हिताचा निर्णय झाल्यावर राजकीय भूमिका का आडव्या येतात हे समजत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आधी हे कायदे चांगले असल्याचा अध्यादेश काढला. नंतर राजकारण सुरू झाल्यावर राजकीय दुकानदारी बंद होईल, या भीतीने तो मागे घेतला. त्यावरून कोण शेतकरीहित पाहत आहे हे दिसते.
दरम्यान, नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ पंजाब, हरियाणा येथील शेतकरी गेल्या चार आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर निदर्शने करीत आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, परंतु सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत झाले नाही. शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, आम्ही पंजाबच्या शेतकरी संघटनांसह देशातील अनेक शेतकरी संघटनांशी चर्चा करीत आहोत आणि लवकरच यावर तोडगा निघू शकेल.
महत्वाच्या बातम्या
- ‘भारतात राहुल गांधी यांची सुटी संपली आहे आणि ते आज इटलीला परत गेलेत’
- ‘धनुष्यबाण ते हवाबाण! नेहमीप्रमाणेच तोंडाची वाफ अन् नुसत्या हवेत पोकळ गप्पा!’
- दिवाकर रावतेंमुळे एसटी महामंडळ तोट्यात : इंटक
- देशातील पहिल्या ‘चालकरहीत’ मेट्रोचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
- शरद पवारांना बजावलेली नोटीस ईडीने मागे का घेतली; नवाब मलिकांचा फडणवीसांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
