जळगाव – राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना एसटी महामंडळाला केवळ पाचशे कोटींचा तोटा होता. शिवसेनेचे तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात हा तोटा साडेपाच हजार कोटींवर गेला. रावतेंनी एसटी महामंडळात खासगीकरणाचे फॅड आणले, असा आरोप इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी यांनी केला.
एसटी कर्मचाऱ्यांना सर्वांत कमी पगार मिळत असल्याची खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली. दहा वर्षांत पगारवाढ नाही, कर्मचाऱ्यांसोबत कराराचेही नूतनीकरण केले नाही. महामंडळ डबघाईस येण्यास रावतेंसोबत मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना जबाबदार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, कामगार व शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी लवकरच महाराष्ट्र इंटकच्या वतीने मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल अशी घोषणा देखील जयप्रकाश छाजेड यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
जयपक्राश छाजेड यांनी सांगितले की, कामगारांमध्ये केंद्राने केलेल्या कायद्यांमुळे दहशत निर्माण झाली आहे. कार्पोरेट घराण्यांच्या सोईसाठी केलेले हे कायदे महाराष्ट्रात लागू होणार नाहीत. असे महाविकास आघाडी सरकारने जाहीर करणे आवश्यक आहे. कामगार व शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी महाराष्ट्र इंटकच्या वतीने मोर्चा काढला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भारतात राहुल गांधी यांची सुटी संपली आहे आणि ते आज इटलीला परत गेलेत’
- … अखेर राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याचे खरे कारण आले समोर
- महाविकास आघाडी कुणालाही घाबरत नाही; ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित : आदित्य ठाकरे
- देशातील पहिल्या ‘चालकरहीत’ मेट्रोचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
- काँग्रेसच्या आमदारांनी घेतली अमित शाह यांची भेट; दोन आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता


