मुंबई : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलं असून पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना २९ डिसेंबरला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असल्याचं वृत्त माध्यमांनी दिले आहे.
एका बाजूला भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना एका भूखंड खरेदी प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठविल्याच्या बातम्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपसह ईडीवर आगपाखड केली आहे. ‘बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं. मी तोंड उघडलं तर केंद्रातील सरकारला हादरा बसेल. राज्यातील सरकार पाडण्यासाठी हे सर्व सुरु असून माझं नाव संजय राऊत आहे, काय उखडायचं आहे ते उखडावं. हे प्रकरण आता भाजपला महागात पडेल,’ असा निर्वाणीचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर आता भाजपातील नेते देखील प्रतिक्रिया देत आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांच्या टीकांवर प्रत्युत्तर दिलं आहे. ‘धनुष्यबाण ते हवाबाण! नेहमीप्रमाणेच तोंडाची वाफ अन् नुसत्या हवेत पोकळ गप्पा! जे सांगायचे ते थेट सांगा अन् पुरावे देऊन मोकळे व्हा! कर नसेल तर ‘डर’ कशाला?’ असा सवाल करत त्यांनी शिवसेनेसह संजय राऊत यांना चिमटा काढला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भारतात राहुल गांधी यांची सुटी संपली आहे आणि ते आज इटलीला परत गेलेत’
- ईडीच्या कार्यालयाबाहेर झळकतोय ‘भाजपा प्रदेश कार्यलया’चा बॅनर!
- महाविकास आघाडी कुणालाही घाबरत नाही; ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित : आदित्य ठाकरे
- देशातील पहिल्या ‘चालकरहीत’ मेट्रोचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
- ‘आय एम नो मसीहा’ सोनूचे पुस्तक प्रकाशित, ट्विटर वर शेअर केला व्हिडीओ


