Share

‘ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या, उगाच कांगावा कशाला करताय?’

Published On: 

मुंबई : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलं असून पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना २९ डिसेंबरला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असल्याचं वृत्त माध्यमांनी दिले आहे.

एका बाजूला भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना एका भूखंड खरेदी प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठविल्याच्या बातम्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपसह ईडीवर आगपाखड केली आहे. ‘बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं. मी तोंड उघडलं तर केंद्रातील सरकारला हादरा बसेल. राज्यातील सरकार पाडण्यासाठी हे सर्व सुरु असून माझं नाव संजय राऊत आहे, काय उखडायचं आहे ते उखडावं. हे प्रकरण आता भाजपला महागात पडेल,’ असा निर्वाणीचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर आता भाजपातील नेते देखील प्रतिक्रिया देत आहेत. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील राऊतांवर हल्लाबोल केला आहे. ‘राऊत शुद्ध कांगावा करत आहेत. सकाळपर्यंत ईडीची नोटीस आलीच नसल्याचं सांगत होते. आता नोटीस आल्याचं सांगत आहेत. दोन तासांत त्यांचा सूर बदलला आहे, असं सांगतानाच राऊतांकडे 120 नव्हे 240 जणांची यादी असेल तर त्यांनी ती ईडीला द्यावी. ईडीला ही यादी देऊन कारवाईची मागणी करावी, तोंडाची वाफ कशाला दवडता? असा सवाल उपाध्ये यांनी केला. तुम्ही जर लाभार्थी नसाल तर ईडीला तशी माहिती द्या. ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाका,’ अशी जहरी टीका उपाध्ये यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेतून केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!