औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी नुकतेच लसीकरणाची गती वाढविण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना काळात फ्रंटलाइनवर काम करणाऱ्यांना लस देण्यात आली. मात्र यात एसटी महामंडळाचे फ्रंटलाइन कर्मचारी मात्र पिछाडीवर आहेत. गुरुवार (दि.१८) पासून एसटीच्या फ्रंटलाइन, व इतर कर्मचारी वर्गाचे लसीकरण सुरु झाल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली. मात्र केवळ ४ जणांनी पहिल्या दिवशी लस घेतल्याचे समोर आले आहे.
कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी केंद्र शासनाने दोन लसींना मंजुरी दिल्यानंतर १६ जानेवारीपासून देशभर लसीकरणाला सुरवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांना व त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक, आजारी असलेल्या व्यक्तींना कोरोना लस देण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात २५ हजार ९९१ जणांची लस घेण्यासाठी नोंद झाली. त्यानंतर १५ हजार १०५ फ्रंट लाईन वर्कर्सची नोंदणी झाली. मात्र एसटी महामंडळाच्या फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या चालक आणि वाहकांची नोंदणी करण्यास इतक्या दिवसांचा कालावधी का लागला? याबाबत माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी हात वर केले.
मध्यवर्ती बसस्थानक आगार प्रमुख एस.ए. शिंदे यांनी गुरूवारी दुपारी अडीच वाजता घाटी रूग्णालयात जाऊन कोरोना लस टोचून घेतली. त्यांच्या बरोबर अन्य एक सुपरवायझरसह चालक, वाहक अशा चार जणांनी केवळ कोरोना लस टोचून घेतलेली आहे.
मात्र इतर चालक आणि वाचकांनी लस घेण्यास नकार दिला आहे. त्यांची समजूत काढून त्यांच्या मनात ज्या काही शंका असतील त्यांचे निराकरण करुन लस घेण्यासाठी जनजागृती केली जाईल अशी माहिती आगार प्रमुख शिंदे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- साष्टपिंपळगाव मराठा आंदोलन : उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती पुन्हा एकदा खालावली
- हरिभाऊ बागडे तु्म्ही आता निवृत्त झाले पाहीजे : चंद्रकांत खैरे
- मनपाचा जीव भांड्यात पडला! केंद्राने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवणे म्हणजे अत्याचार नव्हे
- अंबाबाईच्या मंदिरात संध्याकाळी सहानंतर प्रवेश मिळणार नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
