Share

साष्टपिंपळगाव मराठा आंदोलन : उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती पुन्हा एकदा खालावली

Published On: 

जालना : जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथे गेल्या ५० दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र, राज्य सरकार आरक्षणाला गांभीर्याने घेत नसल्यामुळे आंदोलकांनी माजी केंद्रिय मंत्री तथा खा. शरद पवार यांची थेट बारामतीत जाऊन भेट घेण्याचे ठरविले होते. मात्र ही आरक्षण आक्रोश विनंती रॅली निघण्यापूर्वीच येथील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या पार्श्वभूमीवर संतप्त गावकऱ्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. यातील एका महिलेची प्रकृती खालावल्याने त्यांना अंबड याठिकाणी भरती करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगावमधील गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. आमरण उपोषण मागे घेण्यात आले असले तरीदेखील आंदोलन मागे घेण्यास गावकऱ्यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे या ठिकाणी साखळी उपोषण सुरू होते. मराठा तरुणांकडे गुणवत्ता असूनही आरक्षण नसल्यामुळे तो सुशिक्षित बेकारीत आपले जीवन जगत आहेत.

मराठा तरूणांचा आरक्षण विषय निकाली काढण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी साष्टपिंपळगाव ते बारामती अशी ‘आरक्षण आक्रोश विनंती रॅली’ काढण्यात येणार होती. मात्र, बारामतीला प्रस्थान करण्यापूर्वीच आज सकाळी साष्टपिंपळगाव येथील मुख्य आंदोलकांना तहसीलदारांच्या आदेशानंतर बळजबरीने ताब्यात घेण्यात आले.

या पार्श्वभूमीवर मागील तीन दिवसांपासून १४ जणांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यातील एक उपोषणकर्त्या महिला कौशल्याबाई जाधव वय (६४) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याचे मनोज जरांगे पाटिल यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!