औरंगाबाद : भारतीय जनता पार्टीच्या वयाची ७० री च्या अलिखीत नियमानुसार विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी आता राजकारणामधून निवृत्त झाले पाहीजे, असा सल्ला माजी खासदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे हे उतरले आहेत. या वेळी खैरे यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांबाबत पत्रकार परिषद घेवून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयाबाबत गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी हरिभाऊ बागडे हे दुध संघ, देवगिरी बँक, जिल्हा बँक, विधानसभेसह अजुन किती संस्था त्यांना ताब्यात पाहीजे आहेत. हेच मला समजत नाही. त्यामुळे बागडे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खुप मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत. तर आता बागडे यांनी भाजपच्या नियमानुसार वयाची ७० री आेलांडली आहे. आता त्यांनी स्वत: हून राजकारणामध्ये थांबावे असे माझे मत असल्याचे या वेळी बागडे यांना त्यांना सांगितले.
आमदार हरिभाऊ बागडे यांनी शिवसेनेच्या दोन मंत्र्यांना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार काही काँग्रेच्या नेत्यांना सोबत घेवून शेतकरी विकास पॅनेलची स्थापना केली आहे. तर आता आम्ही महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार देखील उभे केले आहेत. तर आता ही बँक वाचवण्यासाठी आम्ही निवडून येत हे करणार आहोत. तर अगोदरच्या अध्यक्षांमुळे ही बँक रसातळाला गेली आहे. त्यामुळे आता आम्ही ठोस भुमिका घेतली आहे. बागडे यांनी आता निवडणुकीत सहभाग न घेऊ नये. आता ही निवडणुक अटी तटीची होणार नसुन आम्हाला खुप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या :
- महाराष्ट्राची परिस्थिती बनली बिकट, कोरोनाच्या रुग्ण संख्येत होतेय झपाट्याने वाढ
- साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर जॅग्वार देणार कारमध्ये हे खास तंत्रज्ञान
- उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेचे गॉडफादर : नारायण राणे
- जबरदस्तीने वीजबिल वासून कराल तर आम्ही कायदा हातात घेवू; राजू शेट्टींचा आक्रमक इशारा
- सुरू होता बालविवाह, पोलीस येताच वऱ्हाडींनी ठोकली धुम!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
