Share

संप करणाऱ्यांवर एसटीचा कारवाईचा बडगा, औरंगाबादेतील ५ कर्मचारी निलंबित

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात एसटीद्वारे कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नुकसान आणि प्रवाशांचे हाल होत असल्याचा ठपका ठेवत विविध मागण्यांसाठी संप करणाऱ्या औरंगाबाद आगार क्रमांक एक मधील पाच कर्मचाऱ्यांचे मंगळवारी (दि. ९) निलंबन करण्यात आले. रविवारपासून औरंगाबाद डेपो व वर्कशॉप पूर्णपणे बंद असल्याने महामंडळाला जवळपास दीड कोटी रुपयाचा फटका बसला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला तीन उलटले आहेत. अद्याप विलिनीकरणाच्या मागणीवर तोडगा काढण्यात आला नाही. जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. संपामुळे औरंगाबाद आगारातील वर्कशॉप व डेपोतील जवळपास २८०० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

यामुळे ऐन दिवाळीच्या सणात जवळपास दीड कोटीच्या घरात औरंगाबाद आगाराचे नुकसान झाले आहे. दरम्यान, एसटी बंद असल्याने आता रेल्वेस्थानकावर तोबा गर्दी होत आहे. मंगळवारी सकाळी मध्यवर्ती बस स्थानकात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. सिडको बस स्थानकात मुंडण करण्यात आले आणि विभाग नियंत्रक कार्यालयात जागरण गोंधळ कार्यक्रम घेण्यात आला. याशिवाय एमआयएमच्या शिष्टमंडळाने संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भेट दिली.

एसटी कर्मचाऱ्यांचा चौथ्या दिवशीही कायम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या ढासळलेल्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्याने प्रवासी मात्र बेहाल झाले आहेत. मात्र या सगळ्या परिस्थितीचा फायदा खाजगी ट्रॅव्हल्स, गाड्यांना होत आहे. अव्वाच्या सव्वा दराने भाडे वाढ करुन खाजगी एजंट मालामाल होत आहेत. मात्र खासगी गाड्यांवर कोणाचाही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!