Share

‘आम्ही भडकवले तरी एसटी कर्मचारी मूर्ख नाहीत, ते न्याय हक्कासाठी लढत आहेत’

Published On: 

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी मागील तीन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज संपाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. यानंतरही राज्यभरात कर्मचारी मागे हटायला तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा कामगारांना आवाहन केलं आहे. ‘हायकोर्टाने दिलेले आदेश कर्मचाऱ्यांचे हित बघून दिलेत. त्यांची विलिनीकरणाची मागणी मोठी आहे. त्यासाठी समिती नेमली आहे. हा आदेश जसा आम्हाला लागू, तसा त्यांनाही लागू होतोय. यात भडकवणाऱ्या नेत्याचे नुकसान होत नाही, कामगारांचे होत आहे’, असं परब म्हणाले.

यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही भडकवले तरी कर्मचारी मूर्ख नाहीत, त्यांना आपल्या न्याय हक्कासाठी काय करावं नीट समजतंय. त्यामुळे हे कर्मचाऱ्यांचे आंदोलन आहे. त्यांचा संघटनांवर पण विश्वास नाही राहिला. त्यामुळे आम्ही भडकवायचा प्रश्नच येत नाही. कोणाचा सपोर्ट नाही आणि आम्ही सपोर्ट करतोय तर ते पाप करतोय का? असा प्रश्न दरेकर यांनी विचारला आहे.

‘महाविकास आघाडी सरकारला प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसणार असेल तर दुर्दैव आहे. मग त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. दोन चार नेते नव्हे तर भारतीय जनता पार्टी पाठीशी आहे. आमचे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन आहे. तुम्हाला जर भीती वाटत असेल आणि समर्थन करू नये, आमच्या आमदार-खासदारांनी जाऊ नये असे वाटत असेल तर निर्णय घ्या. आम्ही तुमचे अभिनंदन करतो, तुमचे आभार मानू आणि सगळे श्रेय तुम्हाला देऊ असेही दरेकर यांनी म्हटले. तसेच आता आम्हाला चर्चा नको. या कर्मचाऱ्यांची एवढीच मागणी आहे. आता फक्त विलीनीकरणाचा काय करताय ते बोला असेही दरेकर यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!