सातारा : सातारा जिल्हा बँकेसाठी भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि सातारा तालुका विकास सेवा सोसायटीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. खासदार उदयनराजे यांनी गृहनिर्माणमधून अर्ज दाखल केला होता.
त्यांच्याविरोधात सभापती रामराजे समर्थक ज्ञानदेव पवार, दिलीप सिंह भोसले, उदयसिंह बरदाडे यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, अर्ज माघार घेण्याचा शेवटच्या दिवशी यांच्यासह अन्य उमेदवारांनी माघार घेतल्याने उदयनराजेंची बिनविरोध निवड झाली. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात विनय कडव आणि पांडुरंग देशमुख यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांनीही अर्ज काढून घेतल्याने शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही बिनविरोध निवडून आले आहेत.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीमध्ये उदयनराजे भोसले यांनी गृहनिर्माणमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर त्यांचेच बंधू शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना विरोध दर्शविला होता. दोघांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. या दरम्यान खासदार उदयनराजे यांनी जिल्हा बँक आणि यातील पदाधिकाऱ्यांवर तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. यामुळे राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी दिसत होती. परंतु दिवाळीनंतर उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या आणि भाजपा तसेच काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केल्यामुळे उदयनराजेंचा जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा मार्ग मोकळा झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यात मध्यरात्री पर्यंत सुरु असलेल्या बैठकीत उदयनराजे भोसले यांना सर्वसमावेशक पॅनेलमध्ये घेण्यास मंजुरी देण्यात आली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड झालीय. यामुळे उदयनराजे भोसले यांना तिसऱ्यांदा जिल्हा बँकेत संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मलिक साहेब, हायड्रोजन सोडा आता तुम्हाला ऑक्सिजनची गरज लागेल’
- भाजपा नेते एसटी कर्मचाऱ्यांना चिथवून गलिच्छ राजकारण करत आहेत-सचिन सावंत
- ‘नवाब मलिक यांचं डोकं ठिकाणावर नाही, त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज’, दरेकरांचा टोला
- ‘बिगडे नवाब’ म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांना मलिकांच्या मुलीचं सडेतोड उत्तर
- समीर वानखेडेंच्या औरंगाबादेतील आत्याची मलिकांविरोधात तक्रार, एट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी


