🕒 1 min read
लातूर : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर हायकोर्टात पोहोचले आहे. कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत, त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांनी आज मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. राज्यभरातील एसटी कर्मचारी या संपावर ठाम आहेत.
राज्यात ३६ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली पण गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग आली नाही. उलट राज्यातील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. आता तुम्ही आम्हाला सेवा मुक्ती द्या, गोळ्या घाला, हवं तर फाशी द्या पण आम्ही आंदोलनावर ठाम आहोत, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकर्त्या निलंबित एसटी कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, सरकार आमच्यावर रोज वेगवेगळ्या कारवाया करून आमचं लोकशाही मार्गाने चाललेलं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. पण आमचं सरकारला एकच सांगणं आहे, आम्हाला चिडायाला भाग पाडू नका. एकदा का एसटी कर्मचारी चिडला की तुमच्या खुर्च्या कुठं जातील कळणार पण नाही, तुम्हाला पळताभुई थोडी होईल. मंत्र्यांना, आमदारांना रस्त्यावर फिरकुही देणार नाहीत हे लक्षात ठेवा, असा इशारा आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- एसटीचा संप संपेना! मुख्यमंत्र्यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन
- पडळकर आणि सदाभाऊ कामगारांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहेत का?-अनिल परब
- मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार; मुन्ना यादवची प्रतिक्रिया
- भाजपा नेते एसटी कर्मचाऱ्यांना चिथवून गलिच्छ राजकारण करत आहेत-सचिन सावंत
- ‘मलिक साहेब, हायड्रोजन सोडा आता तुम्हाला ऑक्सिजनची गरज लागेल’


