Share

अजब ! तुकाराम मुंढेंनी ठोठावलेला दंड पुणे महापालिका करणार परत

Published On: 

पुणे : आयएएस ऑफिसर तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कडक स्वभावामुळे व नियमांच्या चोख पालनामुळे अनेकदा राजकीय नेत्यांचे व त्यांचे खटके देखील उडालेले पाहायला मिळाले होते. त्यांची वारंवार होणारी बदली ही चर्चेची ठरत असते.

पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीएमएलची जबाबदारी तुकाराम मुंढे यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांची पीएमपीएमएलच्या मुख्य संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी धडाकेबाज निर्णय घेतानाच कंत्राटदारांच्या मुजोरीला देखील छाप लावला होता. यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये आणि मुंढेंमध्ये तणाव देखील निर्माण झाला होता.

मात्र, पीएमपीएमएल ला तोट्यातून बाहेर काढण्यासह पुणेकरांना चांगली व्यवस्था पुरवण्यासाठी त्यांनी कडक नियमांची अंमलबजावणी केली होती. हे नियम मोडणाऱ्यांना त्यांनी दंड ठोठावण्यासह ब्लॅक लिस्ट देखील करण्याचा निर्णय घेतला होता. आता आकारण्यात आलेला तो दंड परत देण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. यामुळे ठेकेदारांवर मेहेरबानी करत सामान्य पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी होणार आहे.

पीएमपीएमएलचे विद्यमान अध्यक्ष आणि सीएमडी राजेंद्र जगताप यांनी याबद्दल प्रस्ताव मांडला होता. महालक्ष्मी ट्रान्सपोर्टला जो दंड ठोठावण्यात आला होता. परत देण्यात यावा, अशी माणगी महापालिकेकडे करण्यात आली होती. या प्रस्तावाला आज मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या ठेकेदाराला आता महापालिका 14 कोटी रुपये परत देणार आहे. यात विशेष म्हणजे, महालक्ष्मी ट्रान्सपोर्टचे मालक सातव हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत.

कामचुकारपणा करणाऱ्या कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांना चाप लावणे, कंत्राटदारांच्या अखत्यारीतील गाडी वारंवार ब्रेकडाऊन होणे, कंत्राटी बसच्या कर्मचाऱ्यांनी सिग्नल तोडणे, आदी गोष्टींसाठी मुंढेंनी ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!