Share

‘आता अँटीबॉडीज लोड होत आहेत’; कोरोनाची लस घेतल्यानंतर कार्तिकने शेअर केला फोटो

Published On: 

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत चालली आहे. अशातच कोरोना लस घेणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे. यात बॉलिवूडमधील कलाकार सुद्धा मागे नाहीत. अनेक सेलिब्रिटींनी कोरोनाची पहिली लस घेतली. नुकतंच बॉलिवूड अभिनेता  कार्तिक आर्यनने सुद्धा कोरोनाची पहिली लस घेतली आहे. मुंबईतल्या खार स्थित पीडी हिंदुजा हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये त्याने कोरोनाची पहिली लस घेतली.

https://www.instagram.com/p/CQbKdMyNU21/?utm_source=ig_web_copy_link

कोरोना लस घेतल्यानंतर त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत त्याला एक कॅप्शन देखील लिहिलीय. ‘आता अँटीबॉडीज लोड होत आहे’. लस जरी घेतली असली तरी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन कार्तिक आर्यनने त्याच्या चाहत्यांना केल आहे. कार्तिक आर्यनने शेअर असलेल्या या फोटोवर फॅन्सनी कमेंट्स केल्या आहेत.

कार्तिक आर्यनच्या हातून एका मागोमाग एक चित्रपट निसटत चालले असल्याचे दिसत होते.  सगळ्यात आधी करण जोहरने कार्तिक आर्यनला त्याच्या ‘दोस्ताना २’ मधून बाहेर काढलं, त्यानंतर बॉलिवूडमधल्या शाहरुख खानच्या प्रोडक्शनचा चित्रपट ‘फ्रेडी’मधून बाहेर काढलं. त्यानंतर तिसऱ्या मोठ्या बजेटच्या चित्रपटातून सुद्धा कार्तिक आर्यनला बाहेर करण्यात आले. यासंपूर्ण प्रकरणावर कार्तिकने कोणतंही प्रतिक्रिया दिली नव्हती. सध्या त्याच्या धमाका या नवीन चित्रपटाची देखील चांगलीच चर्चा होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!