बीड: कोरोना काळात अनेकांचे जीव कोरोना झाल्यामुळे जात आहेत तर अनेकांचे जीव कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले हिते, त्यामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यातून सावरत असतानाच पुन्हा दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन लावलं त्यामुळे पुन्हा संकट ओढवले. अशा परिस्थितीत अनेकांनी आत्महत्या करणे सोपे समजले. असाच प्रकार शहरात किल्लेधारूर येथे झाला आहे.
शहरातील किल्लेधारूर मुख्य रस्त्यावरील असलेल्या मोबाईल शॉपीचे मालक धनंजय पिलाजी (वय ३८) यांनी बुधवारी (ता.२३) दुपारी एक वाजण्याचे सुमारास दुकानातील केबीनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बसस्थानकानजीक असलेल्या मोबाईल शॉपीचे मालक धनंजय पिलाजी नेहमीप्रमाणे दुकान उघडले. काही ग्राहक व काही व्यापारी आले. नेहमीप्रमाणे बोलणे व व्यवहार झाले. वर्दळीनंतर दुपारी एकच्या सुमारास दुकानात आलेल्या एका ग्राहकाने केबीन ढकलुन पाहिल्यानंतर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांचा पंचनामा सुरु आहे.
जवळच्या कुटुंबीयातुन मिळालेल्या माहितीप्रमाणे दीड वर्षाचे लॉकडाऊनमुळे आर्थिक विवंचनेमुळेच झालेल्या तणावातुन ही घटना घडली आहे. अनेकांचे धंदे तसेच हातचे काम या लॉकडाऊनच्या काळात गेले आहेत. गेल्या वर्षीपासून आर्थिक संकटमुळे आत्महत्या झालेले प्रमाण वाढले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सर्वत्र लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या पोटाचे काय, यावर कोणी तोडगा नाही काढला. मृत धनंजय यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
महत्वाच्या बातम्या
- डब्ल्युटीसी फायनल! साउथीला धोनीचा ‘हा’ विक्रम मोडण्याची संधी
- ‘सत्यनारायण की कथा’तून दिग्दर्शक समिर विद्वांस करणार बॉलिवुडमध्ये पदार्पण
- ड्ब्ल्युटीसी फायनल! गीलला बाद करताच साउथीने रचला ‘हा’ विक्रम
- आमचा ‘तो’ संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलाय; नाना पटोलेंच पुन्हा मोठं विधान
- कोरोना काळातही विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज सुरक्षितपणे पार पडले – रामराजे नाईक-निंबाळकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

