मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.हा निर्णय सर्व ओबीसींसाठी धक्कादायक आहे. यातच आता राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढील महिन्यात 19 जुलै रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तर 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.
कोणत्याही परिस्थितीत या निवडणुका होऊ देणार नाही, असा पवित्रा ओबीसी नेते घेत असताना आता निवडणुका लागल्याने हा मुद्दा पेटणार असल्याचे चिन्ह आहे. भाजपमधील ओबीसी नेत्यांनी देखील या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली असून राज्यसरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.
याच मुद्द्यावरून आज भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांकडे या पोटनिवडणुका पुढे ढकलण्याची मागणी फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली आहे.
दरम्यान, ‘जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घोषित झाल्या आहे. यात एकही जागा ओबीसींकरता राखीव राहणार नाहीत. आम्ही राज्यपालांकडे या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. आम्ही हा निर्णय केलाय की याबाबत आम्ही आंदोलन करणार आहोतच. पण सरकारचा डाव असेल की निवडणुका घ्यायच्याच. तर आम्ही या सर्व जागावर फक्त ओबीसी उमेदवार देऊ. मग जिंकलो किंवा हरलो तरी आम्हाला पर्वा नाही. त्या जागा ओबीसींसाठी आरक्षित आहेत असं समजूनच आम्ही त्या निवडणुका लढवू’, अशी आक्रमक भूमिका फडणवीस यांनी स्पष्ट केलीय.
महत्वाच्या बातम्या
- ‘अरे भिकारी माणसा तुझ्यासारखा मी भीकारी नाही’; केआरकेचे विंदूला प्रत्युत्तर
- आशा सेविकांचा संप मिटला, १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ मिळणार !
- इंधनदरवाढीचे गौडबंगाल : भाजपने खापर कॉंग्रेसवर फोडले, नेमकं खरं कोण बोलतंय ?
- ‘पोटनिवडणुकीविरोधात आपण न्यायालयात जाणार’, पंकजा मुंडे आक्रमक
- महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार ! फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट


