मुंबई – कॉंग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या अकाली मृत्यूमुळे कॉंग्रेस पक्षात आणि देशाच्या राजाकणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.खा. राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय असणारे सातव यांच्या निधनामुळे कॉंग्रेसचीच नव्हे तर महाराष्ट्राची देखील मोठी हानी आहे.दरम्यान, राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर कोणाला नेमायचे याची चर्चा आता सुरु झाली आहे.
दरम्यान, राजीव सातव यांच्या निधांमुळे रिक्त जागेवर महाराष्ट्रातील काही नेत्यांपैकी एकाला संधी दिली जाऊ शकेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा, संजय निरुपम यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते अशी शक्यता आहे.
महाराष्ट्रात आदर्श घोटाळ्यामुळे पक्षाची प्रतिमा ही संभ्रमाची झाली होती. तेव्हा पक्षाच्या आदेशावरुन पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रीय राजकारणातून राज्यात आले. त्यांच्या रुपाने राज्याला निष्कलंक व चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्व असलेले मुख्यमंत्री लाभले. यामुळे कॉंग्रेसची प्रतिमा उजळून निघाली. आरोग्य, उद्योग, अर्थ, सहकार, शिक्षण, पर्यटन अशा अनेक क्षेत्रात त्यांनी काम केलं. शिवाय पक्षाने सोपवलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी नीट पार पाडल्या. यामुळे राजीव सातव यांच्या रिक्त जागी त्यांची वर्णी लागू शकते असं सांगितले जात आहे.
मिलिंद देवरा हे देखील या शर्यतीमध्ये असून राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. राष्ट्रीय राजकारणाचा त्यांना देखील अनुभव असून एक युवा नेता राहुल गांधी यांच्या साथीला आला तर त्याचा फायदाच पक्षाला होऊ शकतो असं सांगितले जाते. असे असले तरीही देवरा हे राजकारणात सध्या फारसे सक्रीय नसल्याचे दिसून येते. अनेक आंदोलने,मोर्चे,मेळावे कॉंग्रेसच्या वतीने मुंबईत आयोजित करण्यात आले होते मात्र देवरा हे या बहुतांशवेळी गैरहजरच राहिल्याचे दिसून आले आहे.
संजय निरुपम यांना देखील संधी दिली जाऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आगामी महानगरपालिका निवडणुका तसेच उत्तर प्रदेशासह अन्य राज्यातील निवडणुकीत देखील निरुपम यांचा पक्षाला फायदा होईल असं सांगितले जाते. मात्र निरुपम यांच्यापेक्षा चव्हाण आणि देवरा यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. या सर्व शक्यता गृहीत धरून आपण पृथ्वीराज चव्हाण यांना जरी संधी मिळेल असे मानले तरीही चव्हाण याबाबत काय निर्णय घेणार हे देखील पाहणे महत्वाचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील ओबीसी नेत्यांच्या नाकावर टिच्चून होणार निवडणुका ?
- कालची बैठक म्हणजे जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न ?
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
- ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

